Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Ganeshotsav News : विसर्जन व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह; किनाऱ्यावर गणेशमूर्तींची विटंबना, पालिका- पोलिसांची धावपळ

Vasai Ganeshotsav News : वसई पूर्वेकडील किल्ला जेट्टी परिसरात गणेश विसर्जनानंतर मूर्तींचे अवशेष तुटलेल्या आणि अर्धवट विसर्जित अवस्थेत किनाऱ्यावर आढळल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. माहिती मिळताच पालिका प्रशासन आणि पोलिसांनी अवशेष ताब्यात घेऊन पुनर्विसर्जन केले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 18, 2026 | 02:14 PM
वसई किल्ला जेट्टीवर गणेशमूर्तीची विटंबना ( सौजन्य - सोशल मीडिया )

वसई किल्ला जेट्टीवर गणेशमूर्तीची विटंबना ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • वसई किल्ला जेट्टीवर गणेशमूर्तीची विटंबना
  • किनाऱ्यावर तुटलेल्या अवस्थेत आढळले अवशेष
  • भाविकांकडून विसर्जन व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
Vasai Ganeshotsav News : वसई किल्ला जेट्टी परिसरात गणेश विसर्जनानंतर गणेशमूर्तीचे अवशेष तुटलेल्या अवस्थेत किनाऱ्यावर पडून असल्याचे निदर्शनास आले आहे. काही मूर्ती अर्धवट विसर्जित अवस्थेत चिखलात अडकलेल्या दिसून आल्याने या प्रकारामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या असून, विसर्जन व्यवस्थापनाबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. ( Vasai Ganeshotsav News ) 

Virar Illegal Construction Scam : बनावट परवानग्यांवर अनधिकृत इमारतींचा गोरखधंदा; महारेरा नोंदणीशिवाय सदनिकांची विक्री, दस्तनोंदणी!

दरवर्षीप्रमाणे यंदाही वसई परिसरातील विविध विसर्जन घाटांवर मोठ्या संख्येने गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची संख्या मोठी आहे. समुद्रातील भरती ओहोटी, लाटा आणि चिखलामुळे काही मूर्ती किनाऱ्यावर किंवा उथळ भागात पुन्हा बाहेर येण्याची शक्यता असते.

पुढच्या विसर्जना वेळी दक्षता

वसईतील वरिष्ठ पोलिस निरिक्षक सौरभी पवार म्हणाल्या, “महापालिकेच्या अधिका-यांना याबाबत सूचना दिली असून रात्री सदर गणेश मूर्तीचे विसर्जन उशिराने समुद्राच्या मध्यभागी करण्यात आले. ही प्रक्रिया पार पडेपर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता”.सहाय्यक आयुक्त संगीता घाडीगावकर म्हणाल्या ,”भरती ओहोटीमुळे सदरच्या मुर्त्या मुर्त्या बाहेर आल्या होत्या. घेऊन पुन्हा 66 माहिती मिळाल्यानंतर त्या मुर्त्या ताब्यात घेऊन । विसर्जित करण्यात आल्या. या पुढच्या विसर्जना वेळी दक्षता घेण्यात येईल”.

 व्यवस्थापन काटेकोर करण्याची ठाकरे गटाची मागणी

गणेशोत्सवात विसर्जनानंतर संबंधित यंत्रणेकडून जेट्टी व किनारपट्टी परिसराची पाहणी करून बाहेर आलेल्या मूर्तीचे अवशेष तातडीने हटवणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भाविकांकडून श्रद्धेने आणि विधिवत निरोप देण्यात आलेल्या गणरायाच्या मूर्तीची अशा अवस्थेत विटंबना होऊ नये, यासाठी विसर्जन व्यवस्थापन अधिक काटेकोर करण्याची मागणी शिवसेना उबाठा गटाचे दत्ता जाधव यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून मूर्तीचे अवशेष ताब्यात घेऊन पुन्हा समुद्रात विसर्जित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पुढील विसर्जनाच्या वेळी अधिक दक्षता घेण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पर्यावरणावर होणार परिणाम

विसर्जनानंतर निर्माल्य, मूर्तीचे अवशेष व इतर पूजासाहित्य समुद्रकिनारी किंवा चिखलात पडून राहू नये, यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनी केली आहे. विशेषतः प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विघटन होण्यास बराच कालावधी लागत असल्याने त्यांचे अवशेष समुद्रकिनारी राहिल्यास पर्यावरणावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Virar News: ‘हिंदूंच्या सणांना बंदी का?’ विरारच्या कोपरीत गणेश विसर्जनावरून ग्रामस्थ आक्रमक, तणावाचे वातावरण

Web Title: Vasai fort jetty ganesh idol immersion issue devotees protest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Ganesh Chaturthi 2026
  • Vasai news

संबंधित बातम्या

गणेशोत्सवात Instamart चे ट्रेंड्स; Eco Friendly गणपतींच्या मागणीत 176% तर मावा मोदकांमध्ये 145% वाढ!
1

गणेशोत्सवात Instamart चे ट्रेंड्स; Eco Friendly गणपतींच्या मागणीत 176% तर मावा मोदकांमध्ये 145% वाढ!

Pooja Birari Gauri Avahan 2026: पूजा बिरारींचा मराठमोळा साज खुलला; गौरीच्या स्वागतासाठी नटली, मंगळसूत्राने वेधलं साऱ्यांचं लक्ष
2

Pooja Birari Gauri Avahan 2026: पूजा बिरारींचा मराठमोळा साज खुलला; गौरीच्या स्वागतासाठी नटली, मंगळसूत्राने वेधलं साऱ्यांचं लक्ष

Ganesh Visarjan Traffic: गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; देखावे-विसर्जन मार्गांवर वाहनांना ‘नो एन्ट्री’
3

Ganesh Visarjan Traffic: गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; देखावे-विसर्जन मार्गांवर वाहनांना ‘नो एन्ट्री’

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…
4

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.