Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Visarjan Traffic: गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; देखावे-विसर्जन मार्गांवर वाहनांना ‘नो एन्ट्री’

Ganesh Visarjan Traffic: नाशिकमध्ये गणेशोत्सवादरम्यान देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी आणि गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील काही प्रमुख मार्ग ‘नो व्हेईकल झोन’ म्हणून निश्चित करण्यात आले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 18, 2026 | 12:07 PM
गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; देखावे-विसर्जन मार्गांवर वाहनांना ‘नो एन्ट्री’ (फोटो सौजन्य-ChatGPT)

गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; देखावे-विसर्जन मार्गांवर वाहनांना ‘नो एन्ट्री’ (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • गणेश विसर्जनासाठी नाशिकमध्ये वाहतुकीचे नियोजन
  • ‘हे’ मार्ग असणार नो व्हेईकल झोन
  • गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल
Ganesh Visarjan Traffic: नाशिक शहरात उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांना मनमोहक देखावे सुलभतेने पाहता यावेत आणि विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पडाव्यात, यासाठी नाशिक शहर पोलीस प्रशासनाने वाहतुकीचे विशेष नियोजन केले आहे. पोलीस उपायुक्त (मुख्यालय व वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी मोटार वाहन कायद्यानुसार दोन स्वतंत्र अधिसूचना जारी करून शहरातील पंचवटी परिसरासह मध्यवर्ती मार्गावर ‘नो व्हेईकल झोन’ आणि वाहतुकीत बदल जाहीर केले आहेत. (Ganesh Visarjan Traffic)

१८ व २० सप्टेंबर रोजी निर्बंध

श्री गणेश विसर्जनाच्या ५ व्या दिवशी (शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६) आणि ७ व्या दिवशी (रविवार, २० सप्टेंबर २०२६) घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता दुपारी २ ते रात्री १२वाजेपर्यंत खालील मार्गावर बसेस व अवजड वाहनांना मनाई करण्यात आली आहे.

Nashik Crime: गणरायाच्या स्थापनेसाठी कंपनीत गेले; अन् पुन्हा कधीच परतले नाही!, ३३ वर्षीय इंजिनिअर…

प्रवेश बंद मार्गः निमाणी बसस्थानकावरून पंचवटी कारंजा, मालेगाव स्टैंड मार्गे रविवार कारंजाकडे जाणारा मार्ग,

सी.बी.एस. कडून अशोकस्तंभ, रविवार कारंजा मार्गे पंचवटी कारंजाकडे जाणारा मार्ग.

पर्यायी मार्ग (रूट मॅप)

निमाणीकडून नाशिक रोड, सिडको, सातपूरकडे जाण्यासाठी निमाणी, काट्यामारुती चौक, संतोष टी पॉईंट (किंवा विश्वकर्मा चौक), कन्नमवार पूल, द्वारका या मागनि पुढे जावे. सीबीएसकडून पंचवटी व निमाणीकडे जाण्यासाठी सीबीएस, अशोकस्तंभ, रामवाडी ब्रिज, मखमलाबाद नाका, पेठनाका सिग्नल, दिंडोरी नाका या मार्गाने निमाणी स्टैंडकडे जावे.

पंचवटीतील देखावे पाहण्यासाठी असतील नियम

पंचवटी परिसरातील देखावे आणि आरास पाहण्यासाठी होणारी अभूतपूर्व गर्दी पाहता २१ ते २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत (किंवा देखावे बंद होईपर्यंत) पुढील मागाँवर सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील, प्रवेश बंद मार्ग दिडोरी नाका ते पंचवटी कारंजा व मालेगाव स्टैंड, मखमलाबाद नाका ते मालेगाव स्टैंड. पंचवटी अंतर्गत चौकः मालवीय चौक ते गजानन चौक, गजानन चौक ते नागचौक, नाग चौक ते शिवाजी चौक आणि शिवाजी चौक ते मालवीय चौक, काळाराम मंदिर परिसर: सरदार चौक ते श्री काळाराम मंदिर दरम्यानचे दोन्ही मार्ग.

पर्यायी मार्ग (रूट मॅप)

दिडोरी नाक्याकडून मालेगाव स्टैंडकडे जाण्यासाठी पेठ फाटा, मखमलाबाद नाका, बाथजाबाई छावणी, रामवाडी, चोपडा लॉन्स मार्गाने जाये, दिडोरी नाक्याकडून निमाणी /इतरत्र जाण्यासाठीः दिंडोरी नाका, निमाणी, काट्या मारुती चौक, संतोष टी पॉईट मार्गाने जावे.

मखमलाबाद नाक्याकडून जाण्यासाठी: पेठ नाका मार्गे पर्यायी रस्त्याचा वापर करावा. नियम मोडल्यास कडक कारवाई! हे सर्व निर्बंध पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि संबंधित परिसरातील स्थानिक रहिवाशांच्या वाहनांना लागू असणार नाहीत. या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन अधिनियम व मुंबई पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Nashik News: ‘फक्त दोन मिनिटे झाली, आत जाऊ द्या’; नाशिकच्या खड्ड्यांचा विद्यार्थ्यांना फटका, UPSC केंद्राबाहेर पालकांचा संताप

Web Title: Nashik ganeshotsav traffic plan ganesh visarjan routes declared no vehicle zone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • Nashik

संबंधित बातम्या

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…
1

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

Gauri Pujan: गौराईला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? जाणून घ्या त्यामागील कारणे
2

Gauri Pujan: गौराईला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? जाणून घ्या त्यामागील कारणे

Gauri Puja 2026: गौरी पूजनाचा इतिहास आणि परंपरा; महाराष्ट्रात कसा साजरा केला जातो हा उत्सव
3

Gauri Puja 2026: गौरी पूजनाचा इतिहास आणि परंपरा; महाराष्ट्रात कसा साजरा केला जातो हा उत्सव

Ganeshotsav: असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…! गणेशोत्सवात चिमुकल्यांसाठी बालविश्वाची सफर, ‘या’ मंडळाने थेट…
4

Ganeshotsav: असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…! गणेशोत्सवात चिमुकल्यांसाठी बालविश्वाची सफर, ‘या’ मंडळाने थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.