Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar Flood Free : वसई-विरार शहराला पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेचा ‘मास्टर प्लॅन’! 30 वर्षांचे व्हिजन समोर ठेवून सर्वेक्षण

Vasai Virar Flood Free : दरवर्षी मान्सूनमध्ये सखल भागात पाणी साचून ठप्प होणाऱ्या वसई-विरार शहराला कायमस्वरूपी पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेने पुढील ३० वर्षांचा संभाव्य विस्तार डोळ्यांसमोर ठेवून 'मास्टर प्लॅन' आखला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 26, 2026 | 11:36 AM
वसई-विरार शहराला पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेचा 'मास्टर प्लॅन'! ( सौजन्य - सोशल मीडिया )

वसई-विरार शहराला पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेचा 'मास्टर प्लॅन'! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • पूरमुक्तीसाठी लिडार सर्वेक्षण
  • वसई-विरारसाठी मास्टर प्लॅन
  • भरती-ओहोटीच्या प्रभावाचे गणितीय प्रतिरूपण
Vasai Virar Flood Free : मान्सूनमध्ये दरवर्षी जलमय होणाऱ्या वसई-विरार शहराला कायमस्वरूपी पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेने पुढील ३० वर्षांचा संभाव्य विस्तार डोळ्यांसमोर ठेवून निर्णायक पाऊल उचलले आहे. पुण्यातील खडकवासला येथील ‘केंद्रीय जल आणि विद्युत अनुसंधान केंद्रा’मार्फत संपूर्ण शहराचे हायटेक ‘लिडार सर्वेक्षण’ आणि महापूर नकाशांकन प्रत्यक्ष सुरू केले आहे. महापौर अजीव पाटील्या आणि महापालिका आयुक्त पृथ्वीराज पी. यांच्या प्रमुख उपस्थितीत या महत्त्वाकांक्षी तांत्रिक अभ्यासाला नुकताच प्रारंभ झाला. ( Vasai Virar Flood Free )

SIR Voter List: नालासोपारा मतदार यादीतून ३ लाख नावे वगळली? SIR च्या आकडेवारीवरून भाजपवर गंभीर आरोप

गेल्या अनेक वर्षापासून पावसाळ्यात वसई, नालासोपारा आणि विरारमधील सखल भाग पाण्याखाली जाऊन जनजीवन ठप्प होते. २०१८ मध्ये महापालिकेने १२ कोटी रुपये खर्च करून प्राथमिक अभ्यास केला होता. त्या अहवालाच्या आधारे अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना आखण्यात आल्या, मात्र निधीअभावी अनेक प्रकल्प प्रलंबित राहिले. आता या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात आहे.

नव्या शास्त्रीय सर्वेक्षणातील प्रमुख पैलू

३० वर्षांचे व्हिजनः वाढत्या नागरीकरणाचा विचार करून पुढील तीन दशकांसाठी पावसाळी पाण्याचा नैसर्गिक व गतिमान निचरा होणारी सक्षम प्रणाली उभारणे.
भरती-ओहोटीचा अभ्यासः समुद्राच्या भरतीचा नाल्यांच्या पाण्याचा उलट प्रवाहावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी अत्याधुनिक गणितीय प्रतिरूपण केले जाईल.
पायाभूत त्रुटींचे मॅपिंगः लिडार तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शहरातील सूक्ष्म भौगोलिक चढ-उतार, अडथळे आणि सभाव्य पूरप्रवण भागांचे अचूक रेखांकन होईल.

स्वनिधीतून सुरू असलेल्या उपाययोजना

तांत्रिक अहवाल येण्यापूर्वीच महापालिकेने तात्पुरत्या दिलाशासाठी स्वखर्चातून अनेक कामे हाती घेतली आहेत. यामध्ये सनसिटी गास रस्ता, आचोळे मुख्य रस्ता, नवघर पूर्व रस्ता, विरार-खारोडी (बोळींज) आणि सेंट्रल पार्क या सखल भागांतील प्रमुख रस्त्यांची उंची टप्याटप्प्याने वाढवण्यात आली आहे. याशिवाय निळेमोरे येथे पावसाचे अतिरिक्त पाणी साठवण्यासाठी खासगी विकासकांच्या सहभागातून महत्त्वाचा साठवण तलाव (होल्डिंग पॉण्ड) विकसित करण्याचे नियोजन सुरू आहे.

रेल्वे अडथळा दूरः २६ कोटींचे कल्व्हर्ट्स पूर्ण

पावसाळ्यात नालासोपारा व विरार दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचून मध्य व पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वारंवार घडतात, हा अडथळा दूर करण्यासाठी महापालिकेने रेल्वे प्रशासनाकडे २६ कोटी ७१ लाख रुपये सुपूर्द केले होते. या निधीतून नालासोपारा उत्तर बाजू, नालासोपारा-विरार दरम्यान दक्षिण बाजू आणि वसई रोड-नालासोपारा दरम्यान अशा तीन महत्त्वाच्या ठिकाणी भव्य रेल्वे कल्व्हर्टचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यामुळे रुळांखालील पाण्याचा निचरा पूर्वीपेक्षा दुप्पट वेगाने होण्यास मदत होणार आहे.

विशेष निधीची मागणी

समग्र पूरनियंत्रण आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने राज्य शासनाकडे २९५ कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी केली असून, हा प्रकल्प ‘महाराष्ट्र रिझिलन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत जागतिक बँकेच्या मदतीने पूर्णत्वास नेण्यासाठी हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत.

Vasai Virar Water Cut Crisis : वसई-विरारवर 10% पाणीकपातीचे सावट! 8 दिवसांत अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश

💡

Frequently Asked Questions

  • Que: वसई-विरार शहरात लिडार सर्वेक्षण कोणत्या संस्थेमार्फत केले जातंय?

    Ans: पुण्यातील खडकवासला येथील 'केन्द्रीय जल आणि विद्युत अनुसंधान केंद्रा'मार्फत वसई-विरार शहरात हायटेक लिडार सर्वेक्षण आणि महापूर नकाशांकन केले जात आहे.

  • Que: रेल्वे रुळांवर पाणी साचण्याची समस्या रोखण्यासाठी पालिकेने काय उपाययोजना केली?

    Ans: महापालिकेने रेल्वे प्रशासनाला २६ कोटी ७१ लाख रुपये दिले असून, त्या निधीतून नालासोपारा आणि वसई रोड दरम्यान ३ ठिकाणी भव्य रेल्वे कल्व्हर्टचे बांधकाम पूर्ण केले आहे, ज्यामुळे पाण्याचा निचरा दुप्पट वेगाने होईल.

  • Que: संपूर्ण पूर नियंत्रण आराखड्यासाठी किती निधीची मागणी करण्यात आली?

    Ans: महापालिकेने राज्य शासनाकडे २९५ कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी केली असून, हा प्रकल्प जागतिक बँकेच्या मदतीने 'महाराष्ट्र रिझिलन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम' अंतर्गत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Web Title: Vasai virar lidar survey started for flood free city master plan marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • Flood Issue
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Vasai Virar Water Cut Crisis : वसई-विरारवर 10% पाणीकपातीचे सावट! 8 दिवसांत अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश
1

Vasai Virar Water Cut Crisis : वसई-विरारवर 10% पाणीकपातीचे सावट! 8 दिवसांत अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश

Bus Service : दिवाळी गोड होणार! वसई महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार 40 नव्या ई-बसेस; प्रवाशांची गर्दीच्या त्रासातून सुटका
2

Bus Service : दिवाळी गोड होणार! वसई महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार 40 नव्या ई-बसेस; प्रवाशांची गर्दीच्या त्रासातून सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.