Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar Water Cut Crisis : वसई-विरारवर 10% पाणीकपातीचे सावट! 8 दिवसांत अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश

Vasai Virar Water Cut Crisis : 'अल-निनो'च्या प्रभावामुळे वसई-विरार शहरावर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारने १० टक्के पाणीकपातीचे निर्देश दिले असले तरी शहरात आधीपासूनच दररोज सुमारे ६९.६३ दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 25, 2026 | 11:18 AM
वसई-विरारवर 10% पाणीकपातीचे सावट! ( सौजन्य - सोशल मीडिया )

वसई-विरारवर 10% पाणीकपातीचे सावट! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • वसई-विरारवर 10% पाणीकपातीचे सावट!
  • 8 दिवसांत अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश
  • दैनंदिन तुटवड्याने चिंता वाढली
Vasai Virar Water Cut Crisis : वाढती लोकसंख्या, अपुरा पाणीपुरवठा आणि संभाव्य अल-निनोच्या प्रभावामुळे वसई-विरार शहरावर पाणीटंचाईचे सावट गडद होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर १० टक्के पाणीकपातीचे निर्देश दिले असले, तरी शहरात अद्याप अधिकृत कपात लागू झालेली नाही. ( Vasai Virar Water Cut Crisis )

Jawhar PWD बनावट FDR घोटाळ्याला नाट्यमय वळण! चोरी गेलेली महत्त्वाची फाईल परतली, पण कागदपत्रांची अदलाबदल

मात्र, सध्या उपलब्ध पाण्यातच मोठी तूट असल्याने कपातीचा निर्णय घ्यायचा की नाही, यावर महापालिकेत चर्चा सुरू झाली आहे. येत्या आठ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौर अजीव पाटील यांनी महासभेत दिले आहेत. वसई-विरार शहराची दररोजची पाण्याची गरज ४६९.६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. त्या तुलनेत शहराला विविध जलस्रोतांतून सुमारे ४०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होते.

प्रमाण घटून टंचाईची तीव्रता वाढण्याची भीती

प्रत्यक्षात मात्र ३८० ते ३९५ दशलक्ष लिटर पाण्याचे वितरण केले जाते. त्यामुळे मागणी आणि उपलब्धता यामध्ये दररोज ६९.६३ दशलक्ष लिटरची तफावत आहे. अशा परिस्थितीत आणखी १० टक्के पाणीकपात लागू झाल्यास नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याचे प्रमाण घटून टंचाईची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्य सरकारने अल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पर्जन्यमानात घट आणि जलसाठ्यांवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.

पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर आहे. भविष्यात निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. पाणी कपात करायची झाल्यास तिचे प्रमाण आणि त्याचे परिणाम यांचा सखोल अभ्यास करूनच निर्णय घेतला जाईल. यासाठी आठ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. – अजीच पाटील, महापौर

प्रशासनाचा पाणी नियोजनाचा प्रस्ताव

या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या महासभेत प्रशासनाने पाणी नियोजनाचा प्रस्ताव मांडला.
प्रमाण, त्याचे संभाव्य परिणाम आणि पर्यायी जलस्रोतांचा वापर यांचा अभ्यास करण्यासाठी सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती आणि गटनेत्यांनी एकत्रित चर्चा करून अहवाल द्यावा, असे निर्देश महापौरांनी दिले.

प्रक्रिया केलेले पाणी बांधकामासाठी

शहरातील जुन्या विहिरी पुनर्जीवित करणे, तलाव आणि बावखळांची स्वच्छता करणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करून प्रक्रिया केलेले पाणी बांधकामासाठी वापरण्याच्या उपाययोजनांवरही भर देण्यात येणार आहे. ऑगस्ट २०२७ पर्यंत पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आतापासूनच नियोजन करण्याची भूमिका महापौरांनी मांडली.

Bus Service : दिवाळी गोड होणार! वसई महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार 40 नव्या ई-बसेस; प्रवाशांची गर्दीच्या त्रासातून सुटका

💡

Frequently Asked Questions

  • Que: वसई-विरार शहराला दररोज किती पाण्याची गरज आणि प्रत्यक्ष किती पुरवठा होतो?

    Ans: शहराला दररोज ४६९.६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे, परंतु प्रत्यक्षात विविध जलस्रोतांतून केवळ ३८० ते ३९५ दशलक्ष लिटर पाण्याचेच वितरण होते. ज्यामुळे दररोज सुमारे ६९.६३ दशलक्ष लिटरची तफावत निर्माण होते.

  • Que: वसई-विरारमध्ये १० टक्के पाणीकपातीबाबत काय निर्णय घेण्यात आला?

    Ans: राज्य सरकारने १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपातीचे निर्देश दिले असले तरी, पालिकेने अद्याप अधिकृत कपात लागू केलेली नाही. कपातीचे परिणाम आणि पाण्याचे नियोजन अभ्यासण्यासाठी महापौरांनी ८ दिवसांत सविस्तर अहवाल मागवला आहे.

  • Que: पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिका प्रशासनाने कोणते उपाय सुचवले?

    Ans: जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करणे, तलाव-बावखळांची स्वच्छता करणे आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील प्रक्रिया केलेले पाणी बांधकामासाठी अनिवार्य वापरणे, यांसारख्या उपाययोजनांवर भर दिला जात आहे.

Web Title: Vasai virar water cut scarcity threat mayor directs report in 8 days ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • Vasai Virar
  • water cut

संबंधित बातम्या

Bus Service : दिवाळी गोड होणार! वसई महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार 40 नव्या ई-बसेस; प्रवाशांची गर्दीच्या त्रासातून सुटका
1

Bus Service : दिवाळी गोड होणार! वसई महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार 40 नव्या ई-बसेस; प्रवाशांची गर्दीच्या त्रासातून सुटका

Dharashiv Water Crisis : 9 गावांना 12 पाण्याचे टँकरद्वारे पाणीपुरवठा; 286 खाजगी विहिरी ताब्यात
2

Dharashiv Water Crisis : 9 गावांना 12 पाण्याचे टँकरद्वारे पाणीपुरवठा; 286 खाजगी विहिरी ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.