
Pandharpur Local Body Election:
नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी तेरा तर नगरसेवक पदासाठी 140 उमेदवारी अर्ज दाखल झाले. काल दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले होते आज नगराध्यक्षपदासाठी दाखल उमेदवारी अर्ज पैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार शुभांगी कौडूभैरी, अपक्ष प्रा. तेजस्विनी कदम, प्रणाली अवताडे,माधवी किल्लेदार, क्रांती दत्तू,अरुणा माळी, सुवर्णा चेळेकर. माधुरी कट्टे, संगीता कट्टे, राजश्री चेळेकर,यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. नगरसेवक पदाच्या अर्जातील प्रभाग तीन मधील तिर्थक्षेत्र विकास आघाडीतील भारत नागणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दुपारी 2.30 नंतर मागे घेतल्यानंतर सोमनाथ अवताडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
Palghar News: मोखाड्यात आयशर ट्रकचा भीषण अपघात! मजुरीसाठी गेलेल्या एकाच मृत्यू 40 हून अधिक
काही अपक्ष उमेदवाराकडून पॅनल मधील उमेदवाराच्या विजयात अडचण निर्माण होऊ नये म्हणून उद्योगपती संजय अवताडे, राष्ट्रवादीचे अजित जगताप, प्रवीण खवतोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुशीला आवताडे, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रतिक किल्लेदार हे नगरपालिकेत ठाण मांडून होते. नगराध्यक्षपदाचे अर्जातील 10 तर नगरसेवक पदाच्या अर्जातील 37 अर्ज माघार घेतल्याने निवडणुकीच्या आखाड्यात सुजाता जगताप,सुनंदा अवताडे,राजामती कोंडुभैरी हे नगराध्यक्ष पदासाठी तर 19 नगरसेवक पदासाठी 58 उमेदवारी अर्ज आखाड्यात राहिले. अर्ज माघारी घेणाऱ्या उमेदवाराकडून निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव हे कुणाच्या दबावातून अर्ज मागे घेत आहात का याची विचारपूस करत होते.
उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ नये या दृष्टिकोनातून पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर, दिगंबर गेजगे पोलीस पथकासह नगरपालिकेच्या कार्यालयात ठाण मांडून होते. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या काही उमेदवारावर राजकीय तडजोडीमुळे उमेदवारी अर्ज माघारी घ्यावी लागली त्यावेळी काही उमेदवाराचे डोळे पाणावले. उमेदवार प्रभाग निहाय अर्ज पुढील प्रमाणे, कंसात काढलेले अर्ज नगराध्यक्ष 3 (10) प्रभाग 1 :- 6(3) प्रभाग 2 :- 5 (2), प्रभाग 3 :-6 (7) प्रभाग 4 :- 4 प्रभाग 5 :- 6 (7 )प्रभाग 6 :-4 (6) प्रभाग 7 :- 5 (7)प्रभाग 8 :- 6(4),प्रभाग 9 :-11 (1) प्रभाग 10 :- 5 (1)
प्रभाग तीन मधून सोमनाथ अवताडे नगरसेवक पदासाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी शिवालयात गुलालाची उधळण करत शहरातून मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला. आज आ. समाधान आवताडे यांचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या निमित्ताने आमदारांनी चुलत बंधूला बिनरोध नगरसेवक करून वाढदिवसाची भेट दिली.