फोटो सौजन्य - Social Media
याबाबत प्राथमिक स्वरूपात मिळालेल्या माहितीनुसार मोखाडा तालुक्यातील अनेक मजूर रोजगाराच्या शोधात नाशिक या ठिकाणी कामासाठी जातात हे मजूर रोजंदारीच्या शोधात जात असल्याने कमी पैशांमध्ये प्रवास व्हावा यासाठी मालवाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांचा आधार घेत असतात अशावेळी सहा ते सातच्या आसपास नाशिक वरून मोखाड्याकडे येणाऱ्या एका आयसर ट्रक मध्ये तब्बल पन्नास हून अधिक मजूर बसले होते यानंतर तोरंगण घाटात या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना रात्री आठ वाजता घडल्याने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात याबाबत कळविण्यात आल्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे या सर्व जखमींना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले यातील एकाच्या जागीच मृत्यू झाला आहे तर 40 हून अधिक जखमींवर उपचार सुरू आहेत. यातील ज्यांची परिस्थिती नाजूक आहे त्यांना नाशिक रुग्णालयात देखील हलविण्यात आले आहे.
मोखाडा तालुक्यात सध्या स्थलांतराचे प्रमाण मोठे असताना आता दररोजचे स्थलांतर सुद्धा वाढले आहे यासाठी मोखाड्यातील अनेक मजूर मोखाडा त्रंबक रस्त्यावरील अनेक फाट्यावर येऊन उभे राहतात कमी भाड्यामध्ये गाड्या मिळव म्हणून मालवाहतूक वाहनांमध्ये प्रवास करतात आणि येताना सुद्धा मजुरी मिळाल्यानंतर अशाच वाहनांचा ते जर दिवशी आधार घेत असतात त्यातूनच आज अशाच एका वाहनात प्रवास करत असताना हा मोठा अपघात झाला आहे यामुळे एकीकडे स्थानिक पातळीवर रोजगार नाही दुसरीकडे रोजगारासाठी आपला जीव दररोज धोक्यात घालावा लागत असल्याचे विदारक चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.






