Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arun Lakhani in BJP executive : भाजप कार्यकारणीत मोठा ट्वीस्ट; सुप्रिया सुळे यांचे भावी व्याही अरूण लखानी यांची वर्णी

Arun Lakhani in BJP executive : भाजप कार्यकारणीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या भावी व्याहींची वर्णी लागली आहे. अरूण लखानी यांना भाजपचे सह कोषाध्यक्ष पद देण्यात आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 24, 2026 | 01:31 PM
MP supriya sule daughter revati father in law Arun Lakhani become maharashtra BJP executive

MP supriya sule daughter revati father in law Arun Lakhani become maharashtra BJP executive

Follow Us
Follow Us:
  • खासदार सुप्रिया सुळे यांच्या व्याहींची भाजप कार्यकारणीत वर्णी
  • अरूण लखानी यांना भाजपचे सह कोषाध्यक्ष पद
  • राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
Arun Lakhani in BJP executive : मुंबई : महाराष्ट्र भाजप (BJP Politics) प्रदेश कार्यकारणी जाहीर झाली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. या यादीमध्ये नवा ट्वीस्ट दिसून आला आहे. भाजप कार्यकारणीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या भावी व्याहींची वर्णी लागली आहे. अरूण लखानी यांना भाजपचे सह कोषाध्यक्ष पद देण्यात आले आहे. यावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचा विवाह निश्चित झाला आहे. रेवती सुळे यांचा विवाह सारंग अरुण लखानी यांच्याशी होणार आहे, याबाबत खासदार सुळे यांनी घोषणा केली. सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि पुढे सुप्रिया सुळे यांनी याविषयीची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत दिली होती. दरम्यान, विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरूण लखानी यांना भाजपच्या कार्यकारणीमध्ये स्थान मिळाले आहे. भाजपकडून बहुप्रतिक्षित प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये लखानी यांना भाजपचे सह कोषाध्यक्ष पद देण्यात आले आहे.

हे देखील वाचा : BJP च्या नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक; कृष्णराज महाडिक, राजेश पांडेंकडे नवी जबाबदारी

भाजपच्या कार्यकारणीमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टीकास्त्र डागले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करुन सुषमा अंधारे यांनी टोला लगावला. सुषमा अंधारे यांनी लिहिले आहे की, “भाजपच्या नवीन कार्यकारिणीची यादी आज बघितली… उपाध्ये यांना हळूहळू सतरंजीच्या कोपऱ्यावर आणून हाकलण्याची तयारी सुरू झाली आहे हे बघून खंत वाटली… भाजपच्या संघर्षाच्या काळात भाजपाला सत्ता स्थानी पोहोचवण्यासाठी ज्या लोकांनी खस्ता खाल्ल्या त्यांना नव्या लोकांच्यासाठी सतरंज्या टाकण्याचे काम भाजपाने दिले आहे… ही फडणवीसांची भाजपा आहे.. !” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

भाजपच्या नवीन कार्यकारिणीची यादी आज बघितली… उपाध्ये यांना हळूहळू सतरंजीच्या कोपऱ्यावर आणून हाकलण्याची तयारी सुरू झाली आहे हे बघून खंत वाटली… भाजपच्या संघर्षाच्या काळात भाजपाला सत्ता स्थानी पोहोचवण्यासाठी ज्या लोकांनी खस्ता खाल्ल्या त्यांना नव्या लोकांच्यासाठी सतरंज्या… — SushmaTai Andhare (@andharesushama) February 24, 2026

हे देखील वाचा : अजितदादांचा अपघात नसून घातपातच; आरोपांचा भडीमार सुरुच, आता…

सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग अरुण लखानी हे खेळाडू आहेत. सारंग अरुण लखानी हे एक चांगले बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे. विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे ते पुत्र आहेत.

Web Title: Mp supriya sule daughter revati father in law arun lakhani become maharashtra bjp executive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • BJP Politics
  • MP Supriya Sule
  • political news

संबंधित बातम्या

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
1

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला
2

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला

नागपुरात बंड थोपवण्यात भाजपला अपयश; पुण्यातून चिवटेंची माघार पण अनिल सोले लढण्यावर ठाम
3

नागपुरात बंड थोपवण्यात भाजपला अपयश; पुण्यातून चिवटेंची माघार पण अनिल सोले लढण्यावर ठाम

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश
4

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.