पंढरपूर शहराची एक लाखाहून जास्त मतदारसंख्या आहे. म्हणजे किमान एका आमदाराला निवडूणन देणारी ही संख्या आहे. मात्र, शेकडो कोटींचे बजेट असलेल्या नगरपरिषदेचे काम काय हा प्रश्न कोणालाच पडत नाही.
उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ नये या दृष्टिकोनातून पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर, दिगंबर गेजगे पोलीस पथकासह नगरपालिकेच्या कार्यालयात ठाण मांडून होते.
पंढरपूर नगरपरिषदेच्या 36 नगरसेवक पदासाठी व एक नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदासाठी 8 उमेदवारी अर्ज दाखल आहेत. तर नगरसेवक पदासाठी 366 अर्ज दाखल झाले होते.
राज्य निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरी विविध पक्षांनी नगरपालिका निवडणुकाच आधी होणार हे गृहीत धरून तयारी सुरू केली आहे.
अरण येथे झालेल्या एका कार्यक्रमात डॉ. तानाजी सावंत यांच्यावर टीका केली होती. महाराष्ट्राच्या तिजोरीवर खेकड्यांसारखा डल्ला मारणाऱ्या आरोग्य मंत्र्यांच्या विधानसभा निवडणुकीत नांग्या ठेचून काढू, अशी टीका केली होती.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल (29 ऑगस्ट) पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात मोठी बैठक पार पडली. या बैठकीत वसंतराव देशमुख यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय…