Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur News : सत्कार नको, विठ्ठल भक्तांची सेवा करा! श्रीकांत यादवांचा पदभार स्वीकारताच हार-तुरेंना नकार

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे नवे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी पदभार स्वीकारताच अनोखी भूमिका घेतली. सत्कारासाठी हार, पुष्पगुच्छ आणण्याऐवजी अन्नछत्र किंवा गोशाळेसाठी देणगी देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 11, 2026 | 09:35 PM
सत्कार नको, विठ्ठल भक्तांची सेवा करा! श्रीकांत यादवांचा पदभार स्वीकारताच हार-तुरेंना नकार

सत्कार नको, विठ्ठल भक्तांची सेवा करा! श्रीकांत यादवांचा पदभार स्वीकारताच हार-तुरेंना नकार

Follow Us
Follow Us:
  • श्रीकांत यादव यांनी स्वीकारला विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार
  • सत्कारासाठी येणाऱ्यांना हार-पुष्पगुच्छांऐवजी देणगी देण्याचे आवाहन
  • भाविकाभिमुख, पारदर्शक आणि शिस्तबद्ध प्रशासनावर भर
 

शिवाजी हळणवर/पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे मंत्रालयातील कक्ष अधिकारी श्रीकांत यादव यांनी नुकतीच स्वीकारली. पदभार स्वीकारताच औपचारिक सत्काराला वेळ न देता मंदिर समितीच्या प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यास त्यांनी सुरुवात केली असून, भाविकाभिमुख, पारदर्शक आणि शिस्तबद्ध प्रशासनाला प्राधान्य देण्याची भूमिका त्यांच्या कार्यपद्धतीतून स्पष्ट झाली आहे.

शासनाने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या आस्थापनेवरील कार्यकारी अधिकारीपदावर मंत्रालयीन अधिकारी श्रीकांत यादव यांची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली आहे. यादव यांनी मंत्रालयातील विविध विभागांमध्ये कक्ष अधिकारी म्हणून काम केले असून, ते मूळचे वैराग, ता. बार्शी येथील रहिवासी आहेत. यापूर्वी कार्यकारी अधिकारीपदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी राजेंद्र शेळके यांचा तीन वर्षांचा प्रतिनियुक्ती कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांचा कार्यभार संपुष्टात आला. त्यानंतर शासनाने यादव यांची या पदावर नियुक्ती केली.

मंदिर समितीच्या आस्थापनेवर कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक आणि लेखाधिकारी ही तीन पदे शासन स्तरावरील आहेत. यादव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मंदिर समितीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे स्वागत करण्यासाठी भेटी दिल्या जात आहेत. अनेकांकडून हार, पुष्पगुच्छ आणि सत्काराचे साहित्य आणले जात आहे.

१० हजार चौ.फुटांच्या जागेवर ‘डोळा’? सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली जागा हडपण्याचा आरोप; विरोधकांच्या आक्षेपानंतर प्रस्ताव तहकूब

मात्र, ‘सत्कारापेक्षा सेवा महत्त्वाची’ अशी भूमिका घेत यादव यांनी स्वागतासाठी हार-तुरे व पुष्पगुच्छ आणण्याऐवजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या अन्नछत्रासाठी अथवा गोशाळेसाठी देणगी स्वरूपात योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे. हार-तुरे आणि पुष्पगुच्छांवर होणारा खर्च अन्नछत्र किंवा गोशाळेसाठी दिल्यास त्याचा थेट लाभ भाविक, वारकरी आणि गोमातांच्या सेवेसाठी होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

पदभार स्वीकारल्यानंतर यादव यांनी औपचारिक स्वागत-सत्काराला अधिक वेळ न देता मंदिर समितीच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाला प्राधान्य दिले आहे. मंदिर समितीच्या विविध विभागांचा त्यांनी आढावा घेण्यास सुरुवात केली असून, संबंधित विभागांचे कामकाज, प्रलंबित विषय, उपलब्ध सुविधा आणि प्रशासनासमोरील विविध बाबींची माहिती घेतली जात आहे.

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, मंदिर समितीचे प्रशासन अधिक गतिमान व पारदर्शक करणे आणि कामकाजात शिस्त आणणे, याला प्राधान्य देण्याचा निर्धार यादव यांच्या सुरुवातीच्या कार्यपद्धतीतून दिसून येत आहे. हारांच्या सत्कारापेक्षा सेवेला महत्त्व देत पदभार स्वीकारणाऱ्या यादव यांच्या या भूमिकेची मंदिर परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Pandharpur news shrikant yadav temple committee executive officer service

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 09:35 PM

Topics:  

  • Pandharpur News
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; अभिनव स्नॅक्सला तात्काळ व्यवसाय बंदचे आदेश
1

Solapur News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; अभिनव स्नॅक्सला तात्काळ व्यवसाय बंदचे आदेश

Pandharpur Corridor: पंढरपूरच्या ऐतिहासिक वास्तूंचं होणार संवर्धन, होळकर-शिंदे वाड्यांसह मंदिरांसाठी ३६ कोटींची तरतूद
2

Pandharpur Corridor: पंढरपूरच्या ऐतिहासिक वास्तूंचं होणार संवर्धन, होळकर-शिंदे वाड्यांसह मंदिरांसाठी ३६ कोटींची तरतूद

Solapur News : करमाळ्यात फुटली राजकीय हंडी! काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप समर्थकांसह भाजपमध्ये
3

Solapur News : करमाळ्यात फुटली राजकीय हंडी! काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप समर्थकांसह भाजपमध्ये

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल
4

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.