Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Political News : परभणीत भाजपने मारली जोरदार मुसंडी; कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीच

परभणीमध्ये निकाल लागल्यानंतर कुण्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि उबाठा हे पक्ष या निवडणुकीत स्वतंत्र लढले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 10, 2026 | 05:30 PM
BJP strong comeback in Parbhani no party has a clear majority nanded political news

BJP strong comeback in Parbhani no party has a clear majority nanded political news

Follow Us
Follow Us:
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल हाती
  • परभणीमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत नाही
  • ५४ गटांपैकी भाजपने ४९, राष्ट्रवादी काँग्रेसने ४२ जागांवर विजय
बाळासाहेब काळे : परभणी : मागच्या वेळी फेब्रुवारी २०१७ मधील निवडणुकीत केवळ ५ जागा मिळालेल्या भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली असून २४ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र त्यांना बहुमताचा २८ हा जादुई आकडा गाठता आलेला नाही. (Political News) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष १५ जागा जिंकून दुसऱ्या स्थानी राहिला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला ६, शिवसेना पक्षाला ५, काँग्रेसला २ जागा मिळाल्या असून अपक्ष उमेदवाराने १ जागा मिळाली आहे. मागच्या वेळी (२०१७ ते २२) जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस २४, शिवसेना १२, काँग्रेस ६, भाजप ५, राष्ट्रीय समाज पक्ष ३, सीताराम घनदाट मित्रमंडळ १ आणि अपक्ष २ असे पक्षीय बलाबल होते. (Nanded News)

यावेळी निकाल लागल्यानंतर कुण्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि उबाठा हे पक्ष या निवडणुकीत स्वतंत्र लढले. बहुतांश मतदारसंघात दुरंगी तर कुठे तिरंगी लढती झाल्या. तर काही ठिकाणी शिवसेना क भाजप पक्ष समोरासमोर होते. पक्षीया बलाबलानुसार भाजप पहिल्या स्थानावर राहिली तरीही स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. ५४ गटांपैकी भाजपने ४९, राष्ट्रवादी काँग्रेसने ४२, शिवसेनेने २५, ठाकरे सेनेने २३. काँग्रेसने २१ जागा लढवल्या होत्या. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्रित शिवसेनेचे १२ जिंकल्या होत्या. यावेळेस शिवसेना दोन पक्षात विभागल्या तरीही दोन्ही मिळून ११ जागा कायम राहिल्या असून एका जागेचा फटका बसल्याचे दिसत आहे.

हे देखील वाचा : “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू,” नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले… 

राष्ट्रवादी (अजित पवार गट) ची झाली घसरण
मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे २४ सदस्य निवडून आले होते. यावेळेस राष्ट्रवादीला अजित पवार गटाला १५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
कंग्रेस पक्षाच्या जागा मात्र ६ वरून ३ वर घटल्या आहेत. मागील वेळची अपक्षांची संख्या देखील १ वर आली आहे. आता तब्बल नऊ वर्षानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत उलटफेर पाहायला मिळत आहे. शिवसेना दोन गटात विभागल्यावा परिणाम या निवडणुकीत दिसुन आला. यंदा बहुरंगी लढत पाहायला मिळाल्या, चार ही गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे रा.काँ. ने वर्चस्व राखले.

हे देखील वाचा : म्हाळुंगे-नाणेकरवाडी गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; पै. गणेश बोत्रे व आश्वनि तरस यांचा दणदणीत विजय

भाजपने गंगाखेड, पालम, सेलू, जिंतूर तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने पाथरी, मानवत, सेलू पंचायत समित्यांवर वर्चस्व राखले आहे.
गटाने तुल्यबळ उमेदवार उभे केले होते. त्यांच्या मागे पक्षाने पूर्ण ताकद उभी केल्याचे चित्र दिसून आले, तर शिवसेना उबाता गटाला केवळ दोन गटातच उमेदवार उभे करता आले. काँग्रेसला फार वाईट दिवस आले असून केवळ एका गटातच उमेदवार उभा करता आला. वंचित बहुजन आधाडी ने तीन गटात उमेदवार उभे केले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर खरी लढत राज्याच्या महायुतीत घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, आणि शिवसेना शिंदे गटातच झाल्याचे चित्र दिसून आले.

 

Web Title: Bjp strong comeback in parbhani no party has a clear majority nanded political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • nanded news
  • Parbhani News
  • political news

संबंधित बातम्या

दोन महिला वकिलांमध्ये हाणामारी, न्यायालयीन परिसरातील वाद चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?
1

दोन महिला वकिलांमध्ये हाणामारी, न्यायालयीन परिसरातील वाद चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?

Aditya Thackeray: पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलांवर आदित्य ठाकरे कडाडले; म्हणाले, ‘हिंमत असेल तर राजीनामा द्या अन्…’
2

Aditya Thackeray: पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलांवर आदित्य ठाकरे कडाडले; म्हणाले, ‘हिंमत असेल तर राजीनामा द्या अन्…’

‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन…’, खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकाराला धमकी; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून जाहीर माफी
3

‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन…’, खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकाराला धमकी; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून जाहीर माफी

Maharashtra Politics : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही वाढले भाजपचे संख्याबळ; विधिमंडळात नाही आता मित्रपक्षांची गरज?
4

Maharashtra Politics : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही वाढले भाजपचे संख्याबळ; विधिमंडळात नाही आता मित्रपक्षांची गरज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.