परभणीत आंबेडकर अनुयायांचा संताप (फोटो सौजन्य-X)
parbhani band News In Marathi: परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. तेथे संविधानाची प्रत ठेवण्यात आली आहे. मंगळवारी (10 डिसेंबर) एक माथेफिरुने सायंकाळी 5.30 वा या संविधानाचे प्रतीची विटंबना केली. या घटनेच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर शहरातील आंबेडकरी अनुयायींनी संताप व्यक्त केला. याचदरम्यान पुकारण्यात आलेल्या बंद बंदला हिंसक वळण लागले. शहरात एका जमावाने ठिकठिकाणी मध्यवर्ती भागात वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करीत हिंसक आंदोलन केले. प्रचंड दगडफेक करत घरांचे आणि दुकानांचे नुकसान केले. येथे ठिकठिकाणी रास्ता रोको आणि चक्काजाम करत आंदोलकांनी धुडगूस घातला.
मंगळवारी सायंकाळच्या वेळेत रेल्वे रोको व रास्ता रोकोचे आवाहन केले. आणि आज पुन्हा आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले आहे. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
या घटनेनंतर संतप्त अनुयायांनी उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक केली. परभणी रेल्वे स्थानकावर मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेससमोर घोषणाबाजी करून वाहन अडवले. दरम्यान, आज परभणी कडकडीत बंद पाळण्यात आला. बुधवारी सकाळपासूनच शहरातील अनेक भागात बंद पाळण्यात आला. बाजारपेठा, दुकाने, शाळा-महाविद्यालयात शुकशुकाट दिसला.
परभणी बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस चौकीत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परभणी शहरात आरसीपीच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परभणी बाजारपेठ सकाळपासूनच बंद पाळण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अनुयायी जमू लागले आहेत.
खानापूर फाटा परिसरात आंबेडकरी अनुयायांनी टायर जाळून रास्ता रोको करण्यास सुरुवात केली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परभणी-नांदेड वाहतूक पूर्णपणे बंद आहे. कालांतराने घडलेल्या घटनांचा सखोल तपास करणे आवश्यक आहे. आरोपीची नार्को टेस्ट करत घटनेच्या मागे सूत्रधार कोण आहे याचा शोध घेण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी केली आहे आरोपीविरोधात कडक कारवाई करण्यात यावी. तसे नाही झाले तर संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.