
सप्टेंबर २०२५ महिन्यात एकूण सुमारे ४९.७९ लाखांहून अधिक यूपीआय द्वारे तिकीट व्यवहार झाले असून त्यातून ६४.०० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात ही संख्या आणखी वाढत ७७.३२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर नोव्हेंबर २०२५ मध्ये यूपीआय व्यवहारांमधून सुमारे ७८.६६ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची नोंद आहे. डिसेंबर २०२५ मध्येही हीच वाढती प्रवृत्ती कायम राहिली असून, एकुण सुमारे ६२.५९ लाखांहून अधिक युपीआय द्वारे तिकीट व्यवहार झाले असून, त्यातून ८३.६७ कोटी रूपये महसुल जमा झाला आहे.
एसटी महामंडळाने बसस्थानकांवर, तिकीट खिडक्यांवर तसेच प्रवासादरम्यान कंडक्टरकडून यूपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत असून रोख रकमेचा व सुट्ट्या पैसे ठेवण्याचा त्रास कमी झाला आहे. अर्थात, त्यामुळे सुट्ट्या पैशावरुन वाहकांशी होणाऱ्या अनावश्यक वाद-विवादाला पूर्ण विराम मिळाला आहे. याबरोबरच काही वाहकांकडून होणारा पैशाचा अपहार रोखण्यासाठी देखील डिजिटल पेमेंट प्रक्रियेची मदत झाली आहे. त्यामुळे यूपीआय व्यवहारांमुळे पारदर्शकता वाढली असून महसूल गळतीला आळा बसण्यास मदत होत आहे. येत्या काळात डिजिटल पेमेंटचा वापर आणखी वाढेल, असा विश्वास एसटी प्रशासनाने व्यक्त केला आहे.