Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमचे दाराशी हाय शिमगा! कोकणकरांसाठी ‘लालप’री सज्ज; तब्बल ‘इतक्या’ फेऱ्यांचे नियोजन

गावाकडील मंडळे, कुटुंबे किंवा मित्रमंडळींच्या गटांना सोयीस्कर प्रवास करता यावा, यासाठी गट आरक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. शिमगोत्सव हा कोकणातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 21, 2026 | 09:40 PM
आमचे दाराशी हाय शिमगा! कोकणकरांसाठी ‘लालप’री सज्ज; तब्बल ‘इतक्या’ फेऱ्यांचे नियोजन
Follow Us
Follow Us:

शिमगोत्सवासाठी ‘लालपरी’ची विशेष धाव
कोकणात १९८ जादा फेऱ्यांचे नियोजन
गट आरक्षणाला दिले जाणार प्राधान्य

गुहागर: मुंबई, ठाणे परिसरात स्थायिक झालेल्या कोकणी बांधवांना शिमगोत्सव आणि होळीची चाहूल लागली की गावी जाण्याची ओढ अनावर होते. गावोगावी निघणाऱ्या पालख्या, देवभेटी, जत्रा आणि पारंपरिक कार्यक्रमांमुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळने (एसटी) यंदाही विशेष नियोजन हाती घेतले असून, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी तब्बल १९८ जादा फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी  आणि रायगड या विभागांतून या जादा फेऱ्या धावणार आहेत. होळीच्या काळात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन विभागनिहाय नियोजन करण्यात आले आहे. ठाणे विभाग : ७९ फेऱ्या, मुंबई विभाग : ६२ फेऱ्या, पालघर विभाग : २४ फेऱ्या (पूर्णपणे गट आरक्षणासाठी), रत्नागिरी विभाग : २१ फेऱ्या, रायगड विभाग : ३३ फेऱ्या (आरक्षित प्रवाशांसाठी), एकूण १९८ फेऱ्यांपैकी १४१ फेऱ्या नियमित आरक्षणासाठी उपलब्ध असतील, तर ५७ फेऱ्या गट आरक्षणासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

‘लालपरी’ला बुस्टर; MSRTC मध्ये तब्बल 8,300 बसेस दाखल होणार; सरनाईक म्हणाले; आर्थिक गर्तेतून…

गावाकडील मंडळे, कुटुंबे किंवा मित्रमंडळींच्या गटांना सोयीस्कर प्रवास करता यावा, यासाठी गट आरक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. शिमगोत्सव हा कोकणातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो. गावोगावी होणाऱ्या होळ्या, पालख्या, पारंपरिक नृत्य, देवभेटी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वातावरणात उत्साह असतो. त्यामुळे दरवर्षी हजारो कोकणी बांधव होळीच्या निमित्ताने गावी परततात. एसटीच्या या विशेष मोहिमेमुळे संभाव्य गैरसोय टळणार असून, प्रवाशांना वेळेवर आणि सुरक्षित प्रवासाची हमी मिळणार आहे. शिमगोत्सवाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी ‘लालपरी’ पुन्हा एकदा कोकणाच्या दिशेने सज्ज झाली आहे.

अतिरिक्त बसगाड्या सज्ज ठेवणार
एसटी प्रशासनाच्या माहितीनुसार दि. २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दोन दिवशी सर्वाधिक प्रवासी कोकणाकडे रवाना होण्याची शक्यता आहे. दि. २८ फेब्रुवारी रोजी ९१ फेऱ्या, दि. १ मार्च रोजी ५९ फेऱ्या होतील. या दिवशी प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन अतिरिक्त बसगाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार आणखी फेऱ्या वाढवण्याची तयारीही ठेवण्यात आल्याचे समजते.

अर्थ खात्याविरुद्ध ‘बोंब मारो आंदोलन’; वेतनवाढ फरक हप्ता न दिल्यास…; एसटी कर्मचारी काँग्रेसचा इशारा

 सुरक्षित, सुलभ आणि किफायतशीर प्रवासावर भर
होळीच्या काळात खासगी वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी, रेल्वे तिकिटांची कमतरता लक्षात घेता एसटी हा सर्वसामान्यांसाठी सुरक्षित आणि परवडणारा पर्याय ठरतो. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, वेगवान आणि सुलभ व्हावा यासाठी तांत्रिक तपासणी, चालक-वाहकांचे नियोजन आणि नियंत्रण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Msrtc 198 extra buses to kokan for holi and shimga festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 09:40 PM

Topics:  

  • holi
  • Kokan News
  • msrtc
  • st bus

संबंधित बातम्या

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?
1

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?

MSRTC Fare Hike: ‘एसटी तोट्यात असली तरी…’, १५ टक्के भाडेवाढीसंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय
2

MSRTC Fare Hike: ‘एसटी तोट्यात असली तरी…’, १५ टक्के भाडेवाढीसंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय

एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेचा प्रश्न ऐरणीवर! ‘परिपत्रकांचा अर्थ समजत नसेल तर पगार कशाचा घेता?’ श्रीरंग बरगेंचा संतप्त सवाल
3

एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेचा प्रश्न ऐरणीवर! ‘परिपत्रकांचा अर्थ समजत नसेल तर पगार कशाचा घेता?’ श्रीरंग बरगेंचा संतप्त सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.