कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. २४ मधील निवडणूक निकालांनी स्थानिक राजकारणात शिवसेनेचे स्थान अधिक भक्कम केले आहे. या प्रभागात शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तिन्ही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेला मिळालेला हा तिहेरी बिनविरोध विजय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि शिवसेनेवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे बोलले जात आहे. तर या तिन्ही नगरसेवकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडून व्हिडिओ कॉलद्वारे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, राज्यातील महापालिका निवडणुकांच्या अर्ज छाननीनंतर आता अर्ग मागे घेत राजकीय पक्षांकडून एकमेकांना धक्का दिला जात आहे. भाजपने कल्याण डोंबवलीतून (KDMC) विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता केडीएमसी महापालिकेत भाजप-शिवसेना (Shivsena) युतीचे तब्बल 9 नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यामुळे, 122 संख्याबळ असलेल्या केडीएमसीमध्ये 9 उमेदवार बिनविरोध करत महायुतीने मोठी आघाडी घेतली असून भाजप समर्थकांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. येथे, भाजपचे (BJP) 5 आणि शिवसेना शिंदे गटाचे चार उमेदवार बिनविरोध झाले आहेत. तर, राज्यात भाजपचे 8 आणि शिवसेना शिंदे गटाचे एकूण 5 उमेदवार बिनविरोध झाले आहेत.
कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनचा डंका पाहायला मिळाला. शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी झाले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची यांनी यशस्वी थरलीची भूमिका बजावली. पॅनेल क्र. 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली रणजित जोशी यांची बिनविरोध निवड झाली. तर प्रभाग क्रमांक 28 अ मधून हर्षल राजेश मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदार राजेश मोरे यांचे ते चिरंजीव आहेत. येथील सर्व अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ह्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. सर्व अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेचा भगवा फडकला आहे.






