"महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध", शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन
शायना एन. सी म्हणाल्या की, मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी जातधर्म न पाहता निर्णय घेतले आणि कल्याणकारी योजना लागू केल्या. यात मदरशांचे आधुनिकीकरणासाठी १० लाख रुपये, शिक्षकांच्या वेतनात वाढ करुन १८ हजार केली, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना ५० हजारांपर्यंत शिष्यवृत्ती तसेच परदेशी शिष्यवृत्ती देण्यात आली. अल्पसंख्याक समुदायात उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी १००० कोटी देण्यात आले.
लाडकी बहिण योजनेतून अल्पसंख्यांक समुदायातील लाखो महिलांना लाभ देण्यात आला. स्वच्छ शौचालये, आयुष्यामान भारत कार्ड, घरकुल योजना, मोफत रेशन अशा योजनांमध्ये मुस्लिम आणि अल्पसंख्याक समुदायाला लाभ देण्यात आले. अल्पसंख्यांक समुदाच्या संरक्षणाबरोबच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले, असे शायना एन.सी म्हणाल्या. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावेळी जीवाची पर्वा न करता भारतीय कुटुंबांचे रक्षण करणाऱ्या घोडेवाला सईद आदील हुसेन शाह यांना घर बांधून देण्याचे काम शिवसेनेने केले. मुंबई आणि महाराष्ट्रातील अल्पसंख्यांकांना आर्थिक, सामाजिक न्याय आणि सन्मान मिळावा, अशी शिवसेनेची भूमिका आहे.
अल्पसंख्यांकांसाठी जैन आर्थिक विकास मंडळाला मान्यता देण्यात आली. बुद्धीस्ट संस्थेला १० लाखांचे अनुदान देण्यात आले. व्होटबँकेचे राजकारण न करता शिंदे यांनी सर्व समाजांच्या विकासाचे धोरण राबवले, असे शायना एन.सी म्हणाल्या. मुंबई महापालिकेकडून अल्पसंख्याक समुदायासाठी उच्च दर्जाचे शिक्षण, शिष्यवृत्ती आणि सुविधा पुरवल्या जातात. पालिकेकडून अल्पसंख्याक समाजातील युवकांना रोजगारभिमुख कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच अल्पसंख्याक समुदाच्या शिक्षण संस्थांना अनुदान दिले जाते. महापालिका रुग्णालयांमध्ये अल्पसंख्याक समाजासाठी मोफत उपचार केले जातात, असे शायना एन.सी म्हणाले.
महापालिका निवडणुकीच्या पूर्वीच शिवसेनेचे ७ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. हा फक्त ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे. २९ महापालिकांवर महायुतीचा विजय होईल, असा विश्वास शायना एन.सी यांनी व्यक्त केला. त्या पुढे म्हणाल्या की, शिवसेनेच्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी बिनविरोध निवडून आले. तसेच प्रभाग २८ मधून हर्षल मोरे निवडून आले. जळगाव महापालिकेतील प्रभाग १८ मधून गौरव सोनवणे, प्रभाग ९ मधून मनोज चौधरी आणि प्रतिभा देशमुख हे शिवसेनेचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले.






