Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpri-Chinchwad मध्ये ६० कोटींच्या उपसूचनांचा ‘महाघोटाळा’? पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अडीच तास हायव्होल्टेज ड्रामा

अपक्ष नगरसेवक राहुल कलाटे यांनी या वादात वेगळी भूमिका मांडली. "भ्रष्टाचार आहे की अनियमितता, हे आधी तांत्रिकदृष्ट्या ठरवा. ५२ कोटींच्या या विषयावरून शहराची रोज बदनामी होत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

  • By anuradha sagar
Updated On: May 06, 2026 | 09:51 AM
PCMC, Pimpri Chinchwad, Abhishek Barne, Pravin Jain,

PCMC, Pimpri Chinchwad, Abhishek Barne, Pravin Jain,

Follow Us
Follow Us:
  • पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
  • ‘घोटाळा की अनियमितता’ वादाने सभागृह गाजले!
  • गेल्या ३ वर्षांतील उपसूचनांच्या चौकशीचे आदेश
PCMC News News: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ६० कोटीच्या उपसूचना आणि त्यापोटी अदा करण्यात आलेल्या बिलांचे प्रकरण एखाद्या क्राईम थ्रिलरप्रमाणे गाजले. लेखा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांनी याला ‘महाघोटाळा’ संबोधले, तर सत्ताधारी भाजपने हा प्रशासकीय दोष असल्याचे सांगत विरोधकांचा ‘फेक नॅरेटिव्ह’ उधळून लावला. तब्बल अडीच तास चाललेल्या या वादळी चर्चेनंतर महापौर रवि लांडगे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले असून, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गेल्या तीन वर्षांतील सर्व उपसूचनांची ‘कुंडली’ तपासण्याचे आदेश दिल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नेमका वाद काय आहे?

महापालिकेच्या अर्थसंकल्पात ऐनवेळी सुचविल्या जाणाऱ्या कामांना ‘उपसूचना’ म्हटले जाते. लेखा विभागाने सुमारे ६० कोटी रुपयांच्या उपसूचनांची बिले ज्या घाईघाईने आणि पद्धतीने अदा केली, त्यावरून वादाची ठिणगी पडली. नगरसेवक राजू बनसोडे यांनी आक्रमक पवित्रा घेत, या प्रकरणाचा गुप्त चौकशी अहवाल तात्काळ जाहीर करण्याची मागणी केली. “जर काहीच लपवण्यासारखे नाही, तर अहवाल समोर का येत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Mumbai-Pune Missing Link : मिसिंग लिंकवर वाहनचालकांचा नियमभंग; तीन दिवसांत तब्बल

‘प्रशासनाची चूक, नेत्यांना बदनाम करू नका’

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी या वादात प्रशासनाला धारेवर धरले. ते म्हणाले, “एखाद्या नगरसेवकाने पत्रावर सही केली म्हणून प्रशासन डोळे झाकून बिल काढणार असेल, तर ती सर्वस्वी अधिकाऱ्यांची चूक आहे. यात आमदार किंवा राजकीय नेत्यांचा संबंध जोडणे चुकीचे आहे.” तर नगरसेवक संदीप वाघेरे यांनी थेट लेखाधिकारी प्रवीण जैन यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

भाजपची ‘वाघीण’ विरुद्ध विरोधकांचे ‘नॅरेटिव्ह’

सत्ताधारी भाजपच्या वतीने नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी विरोधकांवर जोरदार प्रतिहल्ला चढवला. “हा विषय भाजपनेच उजेडात आणला आहे, त्यामुळे याला घोटाळा म्हणणे चुकीचे आहे,” असे त्या म्हणाल्या. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनीही पक्षाची बाजू सावरताना, ‘सत्ताधारी म्हणून आम्ही पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध आहोत. दुटप्पी भूमिका घेऊ नका, सत्य समोर येऊ द्या,” असे आव्हान विरोधकांना दिले.

Raj Thackeray: “आरोपीला तडफडून मारलं पाहिजे!” नसरापूर घटनेवर राज ठाकरेंचे तळतळाट; समाजाच्या मानसिकतेवर ओढले ताशेरे

शहराच्या बदनामीवरून राहुल कलाटेंचे ताशेरे

अपक्ष नगरसेवक राहुल कलाटे यांनी या वादात वेगळी भूमिका मांडली. “भ्रष्टाचार आहे की अनियमितता, हे आधी तांत्रिकदृष्ट्या ठरवा. ५२ कोटींच्या या विषयावरून शहराची रोज बदनामी होत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

महापौरांचा आदेश अन् आयुक्तांचा ॲक्शन

सभागृहातील वाढता तणाव पाहून महापौर रवि लांडगे यांनी, जनतेच्या पैशाचा हिशोब लागलाच पाहिजे. आयुक्तांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.

आयुक्तांची कडक भूमिका:

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सभागृहाला आश्वस्त करताना सांगितले की: संबंधित ६० कोटींच्या कामांच्या दर्जाची तांत्रिक चौकशी केली जाईल. गेल्या ३ वर्षांत मंजूर झालेल्या सर्व उपसूचनांचीही चौकशी समितीमार्फत तपासणी होईल. दोषी आढळणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही.

 

Web Title: Pcmc rs 60 crore supplementary bill scandal high voltage drama erupts in general body meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • PCMC News
  • Ravi Landge

संबंधित बातम्या

PCMC मध्ये ‘स्वच्छता सेवा’ मोहिमेचा एल्गार; लोकसहभागातून शहर चकाचक करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट
1

PCMC मध्ये ‘स्वच्छता सेवा’ मोहिमेचा एल्गार; लोकसहभागातून शहर चकाचक करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष
2

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
3

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

PCMC DP Plan News: थेरगावमध्ये रिंगरोड तर मोशीत आरक्षणांना तीव्र विरोध; आकुर्डीत DP आराखड्यावर सुनावणीचा धडाका
4

PCMC DP Plan News: थेरगावमध्ये रिंगरोड तर मोशीत आरक्षणांना तीव्र विरोध; आकुर्डीत DP आराखड्यावर सुनावणीचा धडाका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.