पावसाचा जोर पाहता, कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने पूर्णपणे सतर्क राहावे, असे कडक निर्देश महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या काही सूचना किंवा अडचणी आल्यास त्यावर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. महापौरांनी नागरिकांनाही प्रशासनाला सहकार्य करण्याचे, स्वच्छता राखण्याचे आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे…
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रशासकीय स्तरावर मोठा फेरबदल करण्यात आला असून, प्रशासनाने तब्बल २७२ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 'नगर सचिव' नियुक्तीवरून सत्ताधारी भाजपमध्येच दोन गट पडल्याचे समोर आले आहे. कंत्राटी नगर सचिव म्हणून उल्हास जगताप यांच्या नियुक्तीला स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी थेट आव्हान दिले…
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांच्या आदेशाला पायदळी तुडवत, स्थायी समितीने छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
अपक्ष नगरसेवक राहुल कलाटे यांनी या वादात वेगळी भूमिका मांडली. "भ्रष्टाचार आहे की अनियमितता, हे आधी तांत्रिकदृष्ट्या ठरवा. ५२ कोटींच्या या विषयावरून शहराची रोज बदनामी होत आहे, असे मत त्यांनी…
पिंपरी- चिंचवड शहराला मुबलक पाणी मिळवून देणाऱ्या भामा-आसखेड योजनेला दोन वर्षांचा विलंब झाला आहे. ज्या ठेकेदाराने कामात दिरंगाई केली, त्यालाच पुन्हा काम देण्याच्या हालचालींमुळे प्रशासकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व गटार स्वच्छतेची कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जातील. वारंवार पाणी साचणाऱ्या ठिकाणांची यादी तयार करून त्या ठिकाणी स्वतंत्र निचरा आराखडा तयार केला जाईल.
शहरातील भटक्या श्वानांच्या प्रश्नावरही श्वान संगोपन केंद्र उभारणे, विशेष वाहने उपलब्ध करणे आणि स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधून धोरण तयार करण्याचा विचार सुरू आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून इंद्रायणी नदी प्रदूषित करणाऱ्या कंपन्या व संस्थांवर प्रशासनामार्फत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर रवि लांडगे यांनी दिला.
सध्या हे केंद्र ५५० एमएलडी क्षमतेने कार्यरत असून पवना नदीतील पाण्यावर प्रक्रिया करून तसेच पंपिंग व्यवस्थेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सुमारे ७५ टक्के क्षेत्राला पाणीपुरवठा केला जात आहे.