Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Phaltan News: फलटण दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

पाटण, महाबळेश्वर आणि मेढा या तालुक्यांतील निबंधक कार्यालयांमध्ये नोंदणीचे प्रमाण कमी असतानाही संबंधित प्रकरणे फलटण येथे नेली जात असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाले आहेत

  • By anuradha sagar
Updated On: May 05, 2026 | 01:27 PM
Satara News, Sandeep Pawar, Maharashtra Revenue Dept,

Satara News, Sandeep Pawar, Maharashtra Revenue Dept,

Follow Us
Follow Us:

Phaltan News:   राज्य शासनाच्या ‘एक जिल्हा, एक नोंदणी’ या धोरणाच्या अंमलबजावणीवर सातारा जिल्ह्यात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. फलटण येथील दुय्यम निबंधक क्रमांक दोन कार्यालयात अनियमितता आणि संभाव्य आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी चौकशीची मागणी केली आहे.

संदीप पवार यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फलटण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आठवड्यातील काही दिवस ५० हून अधिक दस्त नोंदणी होत असल्याचे आढळून येत आहे. हा आकडा संशयास्पद असून, दस्तांची आवश्यक तपासणी न करता सर्रास नोंदणी केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

आधुनिक उपकरणांद्वारे वृक्षगणना! मुंबईत लोकसहभाग वाढण्यासाठी पालिकेचे प्रशिक्षण

तसेच ‘एक जिल्हा, एक नोंदणी’ या धोरणाचा गैरवापर होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. इतर तालुक्यांतील व्यवहार जाणीवपूर्वक फलटण येथे वळवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः पाटण, महाबळेश्वर आणि मेढा या तालुक्यांतील निबंधक कार्यालयांमध्ये नोंदणीचे प्रमाण कमी असतानाही संबंधित प्रकरणे फलटण येथे नेली जात असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

या परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांना अनावश्यक प्रवास, आर्थिक भुर्दंड आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली सेवा वापरण्याऐवजी नागरिकांना दुसऱ्या तालुक्यात जावे लागत असल्याने गैरसोय वाढली आहे.

आधुनिक उपकरणांद्वारे वृक्षगणना! मुंबईत लोकसहभाग वाढण्यासाठी पालिकेचे प्रशिक्षण शिबिरांवर भर

या सर्व पार्श्वभूमीवर फलटण येथील दुय्यम निबंधक क्रमांक दोन कार्यालयाच्या कामकाजाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, तसेच सर्व दस्त नोंदणी प्रक्रियेचे ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी संदीप पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाने या गंभीर आरोपांची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

Web Title: Phaltan sub registrar office under scanner allegations of irregularities in property registrations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • Phaltan
  • Revenue Department
  • Satara News

संबंधित बातम्या

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
1

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती
2

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल
3

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल

Satara News: साताऱ्याला आधुनिक विकासाची जोड देणार! स्वातंत्र्यदिनी नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे नागरिकांना  आवाहन
4

Satara News: साताऱ्याला आधुनिक विकासाची जोड देणार! स्वातंत्र्यदिनी नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे नागरिकांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.