Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC Property Tax: पिंपरी चिंचवड महापालिकेचा ७०२ कोटींचा मालमत्ता कर वसूल

कर आकारणी व कर संकलन विभागाची १ एप्रिल २०२५ पासून ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत थेरगाव विभागीय कार्यालयांतर्गत सर्वात जास्त वसुली झाली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 04, 2026 | 04:43 PM
PCMC Property Tax Collection,

PCMC Property Tax Collection,

Follow Us
Close
Follow Us:
  • कर वसुलीत थेरगाव विभाग अव्वल
  • पिंपरी महापालिकेच्या तिजोरीत ७०२ कोटी जमा
  • प्रलंबित कर भरण्याचे नागरिकांना आवाहन
PCMC Property Tax : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत १ एप्रिल २०२५ पासून ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ७०२ कोटी ७३ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. तसेच पुढील दोन महिन्यांत मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीने व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. तरी ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी तो लवकरात लवकर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

महापालिकेच्या कर संकलन विभागाने यावर्षी कर वसुलीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. ऑनलाईन पेमेंट प्रणाली तसेच विविध डिजिटल माध्यमांद्वारे नागरिकांना कर भरण्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबतच, कर भरण्याबाबत एसएमएस, नोटीस व प्रत्यक्ष भेटीद्वारे नियमित पाठपुरावा करण्यात आल्याने वसुलीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.

Baramati Plane Accident: बारामती विमान अपघातप्रकरणी अरविंद सावंतांची मोठी मागणी; तांत्रिक त्रुटींकडेही वेधलं लक्ष

थेरगाव विभागीय कार्यालयांतर्गत सर्वात जास्त वसुली

कर आकारणी व कर संकलन विभागाची १ एप्रिल २०२५ पासून ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत थेरगाव विभागीय कार्यालयांतर्गत सर्वात जास्त वसुली झाली आहे. या कालावधीत या कार्यालयाने ६९ कोटी ३ लाख रुपयांची वसुली केली आहे. तर चिंचवड विभागीय कार्यालयाने ४५ कोटी ४९ लाख, चिखली कार्यालयाने ५४ कोटी २७ लाख, कस्पटे वस्ती कार्यालयाने ४९ कोटी ९८ लाख, मनपा भवन ३४ कोटी २१ लाख, भोसरी ४४ कोटी ९१ लाख, सांगवी ३५ कोटी २६ लाख, मोशी ४३ कोटी ५२ लाख, पिंपरी वाघेरे ४२ कोटी २ लाख, किवळे ४७ कोटी ८७ लाख, वाकड ८७ कोटी ४४ लाख, चऱ्होली २७ कोटी २१ लाख, निगडी प्राधिकरण १५ कोटी ६५ लाख, पिंपरी नगर ५ कोटी ७८ लाख, आकुर्डी ३२ कोटी ९४ लाख, दिघी-बोपखेल २१ कोटी ४० लाख, तळवडे १७ कोटी ६३ लाख, फुगेवाडी-दापोडी विभागीय कार्यालयाने २८ कोटी १० लाख रुपयांची वसुली केली आहे.

 

— तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने केलेले नियोजनबद्ध काम, नागरिकांचा वाढता सहभाग आणि वेळेत कर भरण्यासाठी देण्यात आलेल्या सवलती यामुळे चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. ही वसुली केवळ आर्थिक आकडा नसून, शहराच्या विकासासाठी नागरिकांनी दाखवलेल्या जबाबदारीची साक्ष आहे. उर्वरित मालमत्ताधारकांनीही वेळेत कर भरून शहराच्या विकासात आपले योगदान द्यावे.

मनपाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ रेडी! नगरसेवक अन् अधिकारी प्रभागात काढणार प्रभातफेरी; प्रत्येक वॉर्डाला ५० कोटींचा निधी

— सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

मालमत्ता कर संकलनासाठी विभागामार्फत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर भरण्याबाबत जनजागृती मोहीम, थकबाकीदारांविरोधात प्रभावी कारवाई राबविण्यात येत आहे. या सर्व उपाययोजनांमुळे चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत कर वसुलीचा आकडा ७०० कोटीच्या पुढे गेला आहे. ज्या नागरिकांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांनी पुढील कार्यवाही टाळण्यासाठी तातडीने मालमत्ता कर भरावा.

 

Web Title: Pimpri chinchwad municipal corporation collects property tax worth rs 702 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • PCMC News
  • PCMC Politics

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.