Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आपातकालीन परिस्थितीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग सज्ज

पूरस्थिती किंवा कोणतीही आपत्ती उद्भवल्यास घाबरून न जाता १०० (पोलीस), १०१ (अग्निशमन) किंवा १०८ (आपत्कालीन मदत) या क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा. तसेच, संबंधित प्रभाग कार्यालय अथवा अग्निशमन केंद्राशी थेट संवाद साधावा.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 27, 2025 | 11:38 AM
आपत्तीकालीन परिस्थितीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग सज्ज

आपत्तीकालीन परिस्थितीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग सज्ज

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपातकालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. महापालिकेने प्रत्येक प्रभागनिहाय विशेष पूर नियंत्रण पथके नेमली असून, या पथकांकडे तातडीची मदत, बचावकार्य आणि नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

महापालिकेकडून पूर आणि अन्य आपत्तींमध्ये मदतकार्य करण्यासाठी आधुनिक व अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात १० रबर बोट्स (IRB), २०० लाइफ जॅकेट्स, ४४ लाइफ रिंग्स, ५९ रोप्स, १० हुक्स, १३ पोर्टेबल पंप, वॉटर टेंडर, क्विक रिस्पॉन्स व्हेईकल, फायर फायटिंग मोटारसायकल, ४८ कार्यरत अग्निशमन वाहने, तसेच वायरलेस सेट्स, वॉकी-टॉकी, मेगाफोन आणि टॉर्चेस यांचा समावेश आहे.

महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, पूरस्थिती किंवा कोणतीही आपत्ती उद्भवल्यास घाबरून न जाता १०० (पोलीस), १०१ (अग्निशमन) किंवा १०८ (आपत्कालीन मदत) या क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा. तसेच, संबंधित प्रभाग कार्यालय अथवा अग्निशमन केंद्राशी थेट संवाद साधावा, जेणेकरून मदत त्वरित पोहोचू शकेल.

पथकांचे कार्य आणि जबाबदाऱ्या

अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांमध्ये प्रशिक्षित कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना पोहण्याचे तसेच रेस्क्यू ऑपरेशन्सचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. पूरप्रवण भागांची माहिती, पाण्याची पातळी, वाहणाऱ्या पाण्याचा वेग आणि साचणाऱ्या ठिकाणांची माहिती त्यांच्याकडे आहे. त्यामुळे बचाव कार्य अचूकपणे आणि वेगाने करता येईल.

पथकांकडून करण्यात येणारी प्रमुख कामे

  • पूरग्रस्त भागातील पाणी काढण्यासाठी 10,000 LPM क्षमतेच्या डी-वॉटरिंग पंपाचा वापर.
  • नागरिकांचे रबर बोट, रोप आणि लाइफ जॅकेटच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी स्थलांतर.
  • झाडे पडल्यास चेन सॉच्या साहाय्याने मार्ग मोकळा करणे.
  • विद्युत गळती आढळल्यास विद्युत विभागाच्या मदतीने सुरक्षिततेसाठी पुरवठा खंडित करणे.
  • रेस्क्यू वाहनांच्या मदतीने घटनास्थळी जलद पोहोचणे.

    नागरिकांचा जीव आणि सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य
नागरिकांचा जीव आणि सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीकालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. प्रभागनिहाय पथकांकडे आवश्यक साधनसामग्री आणि प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता थेट संपर्क साधावा.

– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमचा अग्निशमन विभाग सज्ज आहे. पाणी भरलेल्या भागांतून पंपिंग मशीनद्वारे पाणी काढणे, झाडे हटवणे, तसेच रबर बोट व लाइफ जॅकेटद्वारे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे यासाठी सर्व उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.

– उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.

Web Title: Pimpri chinchwad municipal corporations fire department is ready for disaster situations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 11:33 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Pimpri-Chinchwad Municipal Corporation
  • pune news

संबंधित बातम्या

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान
1

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान

Pune Election : भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान; युतीचा सस्पेन्स आज संपणार
2

Pune Election : भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान; युतीचा सस्पेन्स आज संपणार

Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध
3

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…
4

बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.