PM Kisan Scheme: रत्नागिरीतील दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 'पीएम किसान'चा २२ वा हप्ता जमा
२२ व्या हप्त्याचे वितरण झाले असून दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, बँक खाते, मोबाईल क्रमांक, जमीनधारणा प्रमाणपत्र आवश्यक आहे. बँक खात्याशी आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. पीएम किसानचा २२ हप्ता जमा झाला आहे.
Pune ZP : अध्यक्षपदाचा ‘फॉर्म्युला’ अद्याप गुप्तच; जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांचा डाव की संभ्रम?
KYC: जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार १७७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३१ कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही. त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार नाही. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
पीएम किसान योजनेचा हफ्ता जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही हफ्त्यांचा घटनाक्रम पाहता, केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान’ योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर काही दिवसांतच राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. सध्याच्या प्रशासकीय हालचाली पाहता, मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत हा हप्ता वितरित होण्याची दाट शक्यता आहे.
पुणेकरांसाठी गुड न्यूज! Pune Metro चा ‘हा’ महत्वाचा टप्पा मे महिन्यात सुरू होणार
प्रशासकीय पातळीवर यासंदर्भात वेगाने काम सुरू असून लवकरच राज्य सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर केली जाऊ शकते. तरीही, शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. अचूक तारीख स्पष्ट होताच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाईल.






