PM Narendra Modi call Ujjwal Nikam in marathi for appointed as Presidentially nominated MP
Ujjwal Nikam appointed as Presidentially nominated MP : मुंबई : ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. उज्ज्वल निकम हे आता राज्यसभा खासदार असणार आहे. राष्ट्रपती नामनिर्देशित कोट्यातून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांनी पंतप्रधान मोदी यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
सरकारी वकील असलेले उज्जल निकम हे राज्यामध्ये अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वांच्या वकिलांपैकी एक आहे. त्यांना भाजपने लोकसभा निवडणुकीचे तिकीट देत निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले होते. मात्र तिथे त्यांचा पराभव झाला. कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी उज्जवल निकम यांचा पराभव केला. त्यामुळे उज्ज्वल निकम यांचे लोकसभेमध्ये जाण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. यानंतर आता उज्जव निकम यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. राष्ट्रपती नामनिर्देशित कोट्यातून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना स्वतःहून फोन केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उज्ज्वल निकम यांनी एका माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधानांनी केलेल्या फोनबाबत माहिती आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मला फोन आला. ते मराठीमध्ये पहिला प्रश्न विचारताना म्हणाले, उज्जवलजी हिंदीत बोलू की मराठी. त्यानंतर त्यांनी माझ्याशी मराठीत संवाद साधला. त्यांनी मला सांगितले की राष्ट्रपती महोदय तुमच्यावर एक जबाबदारी सोपवू इच्छितात आणि ही जबाबदारी देशाच्या दृष्टीकोनातून चांगली सांभाळाल याच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. मी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तमाम भाजप पक्षाने माझ्यावर लोकसभा निवडणुकीवेळी जो विश्वास प्रकट केला होता, तो यावेळी सार्थ करुन दाखवेन,” असे उज्ज्वल निकम म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर जबाबदारी आल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले आहे की, “अर्थात राष्ट्रपती नियुक्त सदस्य असल्याने माझ्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे कायद्याचा अभ्यास, कायद्याचे विश्लेषण या देशाच्या ऐक्याकरता, देशातील लोकशाही, आमचं संविधान हे कशारितीने प्रबळ राहिल, याची काळजी घेण्याकरिता मी माझ्या बुद्धीच्या कृतीप्रमाणे मी निश्चित प्रयत्न करेन, असं मी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करतो. कारण महाराष्ट्रातून माझ्या एकट्याचीच नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे. त्यामुळे राष्ट्रपती महोदयांचे मी व्यक्तीश: आभारी आहे. तसेच निश्चित मला कल्पना आहे की ही जबाबदारी जरी मोठी असली तरी आपल्या सर्वांचे, महाराष्ट्रातील जनतेचे, इतर भाषिकांचे सहकार्य मला मिळेल यात शंका नाही,” असेही उज्ज्वल निकम यांनी म्हटले.