राहुल गांधी यांना एक चिमुरडी भेटली असून पंतप्रधानांना भेटल्यासारखे वाटले असल्याच्या भावना तिने व्यक्त केला.
Rahul Gandhi Political News : ओडिसा : कॉंग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली आहे. संसदेमध्ये देखील राहुल गांधी यांनी अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी एनडीएवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, राहुल गांधी हे सध्या विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहत असून त्यांची कामाची पद्धत ही तरुणांना भावत आहे. यामध्ये आता राहुल गांधी यांच्यासोबत भेट झाल्यानंतर चिमुकलीने त्यांना थेट पंतप्रधानांना भेटल्यासारखे वाटल्याची भावना व्यक्त केली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
कॉंग्रेस खासदार राहुल गांधी हे ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी संविधान वाचवण्यासाठी सभा घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. कॉंग्रेस पक्षाच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ओडिसा मधील एक चिमुकली मुलगी खासदार राहुल गांधी यांनी भेटली असून राहुल गांधींनी देखील तिला चॉकलेट दिले. मंचावर झालेल्या या भेटीवेळी राहुल गांधींनी तिची विचारपूस देखील केली. या संवादानंतर माध्यमांना अनुभव सांगताना या चिमुरडीने थेट पंतप्रधानसोबत भेट झाल्याचे सांगितले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाली चिमुरडी?
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत भेट झाल्यानंतर चिमुकलीच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसून येत होता. यावेळी ती म्हणाली की, राहुल गांधींना भेटल्यानंतर असे वाटले की मी पंतप्रधानांना भेटले. इतर कोणालाही नाही. ते मला पंतप्रधानांसारखे वाटले. ते मला फक्त नेते वाटले नाहीत. राहुल गांधी यांना नेता नाही तर पंतप्रधान झाले पाहिजे, अशा भावना राहुल गांधींची भेट घेतलेल्या चिमुकलीने व्यक्त केल्या आहेत.
राहुल गांधी आणि तिची मंचावर भेट झाली. यावेळी काय संवाद झाला याबाबत देखील तिने सांगितले. ती म्हणाली की, त्यांनी विचारले की तुझा आवडीचा विषय कोणता तर मी सांगितले की गणित. त्यांनी विचारले चांगले गुण मिळवते का तर मी सांगितले की मी खूप चांगले गुण मिळवते. ते म्हणाले अशीच काम करत रहा. मी सांगितली माझी आई, मामा तुमचे खूप मोठे चाहते आहेत. सगळे तुमच्यावर प्रेम करतात. माझ्याकडून तुझ्या घरच्यांना खूप प्रेम सांग, असा राहुल गांधींसोबत संवाद झाला असल्याचे त्या चिमुरडीने सांगितले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंचावर आलेल्या या चिमुरडीसोबत संवाद साधल्यानंतर राहुल गांधी यांनी तिला चॉकलेट देखील दिले. त्याचबरोबर कॉंग्रेसची माळ देखील घातली. त्यानंतर चिमुरडी राहुल गांधी यांच्या मांडीवर बसून संवाद साधत होती. अशीच अभ्यास करत रहा असे राहुल गांधी म्हटले असल्याचे देखील चिमुरडीने सांगितले. चिमुकली आणि राहुल गांधी यांच्यामधील हा भावनिक संवाद आणि याचा व्हिडिओ सोशल मीडिय़ावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, देशातील लहान लहान मुलांना सुद्धा राहुल गांधी पंतप्रधान व्हावी असे वाटते, असे कॉंग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या आणि राहुल गांधी यांच्या महत्त्वकांशा यामधून दिसून आल्या आहेत.