Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तेल व वायूचे संवर्धन करणे म्हणजे…; ‘सक्षम २०२५-२६’ अभियानात काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात हरित उर्जेला प्राधान्य देण्यात येत आहे. शालेय जीवनामध्ये तेल संवर्धनाचे महत्त्व पटवून दिल्यास भविष्यात त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो, असे मंत्री लोढा म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 02, 2026 | 08:02 PM
“तेल व वायूचे संवर्धन करणे म्हणजे…;  ‘सक्षम २०२५-२६’ अभियानात काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?
Follow Us
Follow Us:

नैसर्गिक तेल व वायूची बचत ही देशसेवाच- लोढा 
ऊर्जा संवर्धनासाठी ‘सक्षम २०२५-२६’ अभियानाची सुरुवात
 इंधन बचत हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ध्येय

मुंबई: नैसर्गिक तेल व वायूची बचत करणे ही देशाची सेवा आहे. विकसित भारत २०४७ च्या उद्दीष्टामधील​ आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे इंधन बचत हे ध्येय असून प्रत्येकाच्या सहभागाने देश हे ध्येय साध्य करेल. तेल व वायूचे संवर्धन करणे म्हणजे हरित ऊर्जेचा अंगीकार करणे हा आपल्या प्रत्येकाच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या ​भासग असून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.​ प्रभादेवी​ येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य शासनाच्या सहकार्याने तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयकांकडून विविध जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत ‘संरक्षण क्षमता महोत्सव २०२५-२६’ चा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे राज्यस्तरीय समन्वयक उमेश कुलकर्णी, महाराष्ट्र बीपीसीएलचे प्रमुख रिटेल (पश्चिम)चे थॉमस जेम्स, एमएच-१ आणि गोवा, बीपीसीएलचे राज्य प्रमुख (रिटेल) चे मिहिर जोशी, एचपीसीएलचे उपमहाव्यवस्थापक बरुण कुमार, आयओसीएलचे महाव्यवस्थापक देवांशू मिश्रा, गेल इंडिया लिमिटेडचे महाव्यवस्थापक (विपणन) जितेंद्र गुप्ता, राज्य समन्वयक विभाग मुख्य प्रबंधक दीपक वाघ, राज्य समन्वयक विभाग वरिष्ठ प्रबंधक रितेश जाधव, शालेय विद्यार्थ्यी तसेच राज्यातील विविध इंधन वितरक उपस्थित होते.

“जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण…”; Union Budget 2026 वर मंत्री मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया

कार्यक्रमात मंत्री लोढा म्हणाले की, राज्य तेल व समन्वय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या संरक्षण समता महोत्सव अभियानाचा उद्देश जीवाश्म इंधनांचा अपव्यय कमी करणे, परकीय चलनावरील वाढता भार रोखणे तसेच हरितगृह वायूंमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान कमी करणे हा आहे. आज जगभरात ऊर्जेला सर्वाधिक मागणी आहे. जागतिक स्तरावरील राजकारण तेलाभोवती एकवटले आहे. इंधनाची बचत करणे म्हणजे देशाच्या प्रगतीला हातभार लावणे असे आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करून आपण तेल बचत करू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात हरित उर्जेला प्राधान्य देण्यात येत आहे. शालेय जीवनामध्ये तेल संवर्धनाचे महत्त्व पटवून दिल्यास भविष्यात त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. प्रत्येक घटकाचा तेल बचतीमधील खारीचा वाटा हा देशाच्या प्रगतीला हातभार लागू शकतो असे मत मंत्री लोढा यांनी व्यक्त केले.

“महाराष्ट्रातील आयटीआय सर्वोत्तम ‘स्किल…”; काय म्हणाले मंत्री Mangal Prabhat Lodha?

राज्य​भरात संरक्षण क्षमता महोत्सव राबविणार – उमेश कुलकर्णी

राज्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे राज्यस्तरीय समन्वयक उमेश कुलकर्णी म्हणाले की, भारत सरकारच्या ऊर्जा सुरक्षितता, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘सक्षम २०२५-२६ (संरक्षण क्षमता महोत्सव)’ या राष्ट्रीय अभियानाची आजपासून देशभरात सुरुवात होत आहे. १ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत “Conserve Oil & Gas, Go Green (तेल आणि गॅस वाचवा, हरित ऊर्जा स्वीकारा)” या घोषवाक्यासह हे अभियान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि संबंधित राज्य शासनाच्या सहकार्याने तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयकांकडून विविध जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

Ravindra Natya Mandir, Mumbai.
Attended the inaugural ceremony of SAKSHAM 2025–26 (Sanrakshan Kshamata Mahotsav), organised by the Central Ministry of Petroleum and Natural Gas. The programme brought together leaders from the petroleum and natural gas sector to discuss energy… pic.twitter.com/ESHlIEMAcd
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) February 2, 2026

सक्षम अभियानाच्या पंधरवड्यात शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गटचर्चा व वादविवाद, महाविद्यालयांमध्ये भित्तीचित्र व ग्राफिटी स्पर्धा, इंधन-कार्यक्षम वाहनचालक स्पर्धा, लेखन स्पर्धा, दूरदर्शन व रेडिओवरील चर्चासत्रांचे आयोजन. या अभियाना दरम्यान शालेय विद्यार्थी, युवक, एलपीजी वापरकर्ते, वाहनचालक, उद्योग क्षेत्रातील कर्मचारी, शेतकरी, गृहनिर्माण संस्था, ग्रामपंचायती व स्वयंसेवी संस्था यांच्यापर्यंत पोहोचून इंधन संवर्धनाचे महत्त्व, फायदे आणि उपाय योजनांबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. इंधन-कार्यक्षम तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.​ राज्य समन्वयक विभाग मुख्य प्रबंधक दीपक वाघ यांनी​ यावेळी इंधन बचतीची शपथ दिली. यावेळी मायरा फाउंडेशनतर्फे इंधन बचतीचे पथनाट्य​ ​ही सादर करण्यात आले.

Web Title: Mangal prabhat lodha said saving natural oil and gas is a service to nation saksham abhiyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • PM Narendra Modi
  • Viksit Bharat

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
1

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
2

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
3

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता
4

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.