
"महाराष्ट्राचे आभार, अहोरात्र परिश्रम करणाऱ्या..."; PM Narendra Modi यांनी केले महायुतीचे अभिनंदन
महायुतीच्या विजयावर पंतप्रधान मोदींचे ट्वीट
29 पैकी 25 महापालिकांवर महायुतीची सत्ता
मुंबईत महायुती बहुमतांच्या खाली
राज्यातील 29 महानगरपालिकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. 29 पैकी 25 महापालिकेत महायुतीची सत्ता आलेली आहे. मुंबईत अजूनही मतमोजणी सुरू आहे. दरम्यान पुणे, पिंपरी चिंचवड आणि अन्य महापालिकेत महायुतीची सत्ता आलेली आहे. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीच्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्वीट काय?
महाराष्ट्राचे आभार ! राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत! विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा , राज्याशी जोडलेल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे.
महाराष्ट्राचे आभार ! राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत! विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या… — Narendra Modi (@narendramodi) January 16, 2026
अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचा प्रचंड विजय हा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विकास धोरणांवर देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांचा विश्वास दर्शवितो. हे ऐतिहासिक यश म्हणजे राज्यातील महायुती सरकारने केलेल्या विकास आणि लोककल्याणकारी कामांना जनतेने दिलेली मान्यता आहे. या प्रचंड पाठिंब्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचे मनापासून आभार मानतो.”
अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सर्व भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचे या विजयाबद्दल मनापासून अभिनंदन केले.
राज्यातील महानगरपालिकेतील निवडणुकीत महायुतीच्या विजयाबद्दल अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी अभिनंदन केले आहे. राज्यातील बीएमसीसह २९ नगरपालिका संस्थांच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युती आघाडीवर असल्याचे ट्रेंडमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. गडकरी यांनी इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या प्रगतीच्या प्रवासाला आणखी बळकटी मिळेल.