Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway News : पुणेकरांसाठी मोठी संधी! ‘भारत गौरव’ ट्रेनने ५ तीर्थक्षेत्रांचे मिळणार दर्शन

पुण्यातून भारत गौरव’ विशेष ट्रेनद्वारे १२ दिवसांची पुरी–कामाख्या–बैद्यनाथ धाम यात्रा सुरू होणार आहे. २५ जून पासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 22, 2026 | 04:29 PM
IRCTC Launches ‘Bharat Gaurav’ Train from Pune for 5-Destination Pilgrimage Tour

IRCTC Launches ‘Bharat Gaurav’ Train from Pune for 5-Destination Pilgrimage Tour

Follow Us
Follow Us:
  • IRCTCची पुण्यातून धार्मिक यात्रा
  • १२ दिवसांची विशेष ट्रेन जाहीर
  • जाणून घ्या
Bharat Gaurav Tourist Train : पुणे :  पुणे करांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयआरसीटीसी तर्फे ‘भारत गौरव’ विशेष पर्यटक ट्रेनद्वारे पुणे रेल्वे स्थानकावरून पुरी–कामाख्या–बैद्यनाथ धाम अशी धार्मिक यात्रा २५ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. ही यात्रा एकूण १२ दिवसांची असून भाविकांना एकाच प्रवासात देशातील अनेक प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. याबाबतची माहिती आयआरसीटीसीचे पश्चिम विभाग प्रवक्ते डॉ. ए. के. सिंह यांनी दिली.

हे देखील वाचा : Railway News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; वाराणसीसाठी ‘अमृत भारत’ एक्सप्रेसला मंजूरी

या विशेष यात्रेत ओडिशातील जगन्नाथ मंदिर (पुरी), आसाममधील कामाख्या मंदिर (गुवाहाटी), झारखंडमधील बैद्यनाथ धाम (जसीडीह) यांसह वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर (वाराणसी) तसेच राम जन्मभूमी मंदिर (अयोध्या) या प्रमुख धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व सुविधा असलेल्या या पॅकेजची सुरुवात प्रति व्यक्ती २२,७७० रुपयांपासून करण्यात आली आहे. यामुळे हे धार्मिक पर्यटनासाठी एक सर्वसमावेशक पॅकेज ठरणार आहे.

या विशेष ट्रेनसाठी पुण्यासह, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड, चाळीसगाव जंक्शन, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा आणि नागपूर या स्थानकांवर चढण्याची व उतरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना महाराष्ट्रातील विविध भागांतील यात्रेचा लाभ घेता येणार आहे.

प्रवासी आपल्या सोयीप्रमाणे इकोनॉमी स्लीपर (एसएल), स्टँडर्ड ३ एसी तसेच कम्फर्ट २ एसी या श्रेणींमधून विविध पर्याय उपलब्ध आहेत. या ट्रेनची एकूण क्षमता ७५० प्रवाशांची असून किमान ४५० प्रवाशांनी आरक्षण केल्यावर ही गाडी चालविण्यात येणार असल्याची माहिती आयआरसीटीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय शर्मा यांनी दिली. या यात्रेसाठी नोंदणी आयआरसीटीसीच्या पर्यटन संकेतस्थळावर सुरू करण्यात आली आहे.

पॅकेजची प्रमुख वैशिष्ट्ये

  • २ एसी, ३ एसी आणि नॉन-एसी स्लीपरमधील आरामदायी रेल्वे प्रवास
  • बजेट हॉटेलमध्ये निवास व्यवस्था (डबल/ट्रिपल/क्वाड शेअरिंग)
  • प्रवासादरम्यान शुद्ध शाकाहारी भोजनाची सोय
  • एसी/नॉन-एसी वाहनांद्वारे स्थानिक प्रवास व पर्यटन स्थळांचे दर्शन
  • संपूर्ण प्रवासासाठी विमा संरक्षण
धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार 

धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने आयआरसीटीसीचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून, आगामी काळात अशा प्रकारच्या आणखी विशेष ट्रेन सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील वाचा : Pune fertilizer Scam : युरिया साठ्यातील तफावत भोवली; पुणे जिल्ह्यातील १५ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

Web Title: Pune bharat gaurav train 5 pilgrimage tour irctc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • Marathi News
  • Pune
  • Railway News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ;  किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,
2

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
3

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश
4

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.