US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप 'नेस्तनाबूत'; अमेरिकेने केला गेम? (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी(04 मार्च 2026) इराण(Iran) ची विनाशकारी युद्धनौका IRIS Dena श्रीलंकेच्या सागरी हद्दीत बुडाली आहे. या घटनेची श्रीलंकेच्या नौदलाने पुष्टी केली आहे. तसेच एका मोठ्या बचाव मोहिमेनंतर 30 नाविकांना वाचवण्याच यश आले असल्याचे श्रीलंकेने म्हटले आहे.
श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिथा हेराथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (04 मार्च 2026) पहाटे पाचच्या सुमारास IRIS Dena या जहाजाकडून त्यांना आपत्कालीन संदेश मिळाला होता. हे जहाज श्रीलंकेच्या दक्षिणेकडे गाले बंदापासून 40 नॉटिकल मैल अंतरावर बुडाले असल्याचे म्हटले आहे. माहिती मिळताच श्रीलंकेची दोन बचाव जहाचजे आणि हवाई दलाचे एक विमान तातडीने दाखल झाले होते. जहाजावर एकूण 180 कर्मचारी होती, यातील 30 जणांनाच वाचवण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना अशा वेळी घडली आहे. जेव्हा अमेरिकेने इराणचे 17 जहाजे समुद्रात गाडल्याचा दावा केला आहे. अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात ऑपरेशन एपिक फ्युरी सुरु केले होते. अमेरिकन सेंट्रल कमांडचे कमांडर अॅडमिरल ब्रॅड कूपर यांनी अमेरिकेच्या नौदलाने इराणची 17 जहाजे आणि 1 पाणबुडी समुद्रात गाडली असल्याचा दावा केला आहे. यामुळे अमेरिका-इस्रायल या हल्ल्याला कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. परंतु अद्याप जहाज बुडण्याचे अधिकृत कारण समोर आलेले नाही.
याच वेळी इराणने देखील अमेरिकेवर मोठा प्रहार केला आहे. इराणने मध्य आखाती देशांमध्ये अमेरिकेची लष्करी तळे उद्ध्वस्त केली आहेत. इराणने 500 हून अधिक क्षेपणास्त्रे, 2000 हून अधिक ड्रोन्स डागले आहेत. बहरीन, कुवेत, कतार येथील लष्करी तळे नष्ट केली आहेत. याशिवाय कतारमधील सर्वात शक्तीशाली डिफेन्स रडारही नष्ट केले आहे. यामुळे हे युद्ध अधिक भडकले आहे.
सध्या या युद्धाचा जागतिक स्तरावर गंभीर परिणाम होत आहे. होमुर्झ सामुद्रधुनी बंद असल्याने तेल व्यापार थांबला आहे. ज्यामुळे जागतिक तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याचा भारतावरही परिणाम होत आहे. अनेक भारतीय आखाती देशांमध्ये अडकले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा विस्कळीत झाल्यानेही मोठा गोंधळ उडाला आहे.
Ans: भारताच्या शेजारी इराणची विनाशकारी युद्धनौका IRIS Dena श्रीलंकेच्या सागरी हद्दीत गाले बंदापासून 40 नॉटिकल मैल अंतरावर बुडाले असल्याचे वृत्त आहे.
Ans: सध्या इराणची विनाशकारी युद्धनौका IRIS Dena चे समुद्रात बुडण्यामागचे अधिकृत कारण स्पष्ट नाही. परंतु ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा अमेरिकेने इराणची 17 युद्ध जहाजे आणि 1 पाणबुजी समुद्रात गाडली असल्याचा दावा केला आहे.






