Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीगोंद्यात दुधातून ‘विषप्रयोग’, आता चहाऐवजी उसाच्या रसाला मागणी; कसं बनवतात बनावट दूध? : जाणून घ्या सविस्तर

दूध भेसळीचे मोठे रॅकेट अन्न - औषध प्रशासन व पाेलिसांनी नुकतेच उघड केले. तेव्हापासून येथील लोकांनी दूध व दुग्धजन्य पदार्थांचा धसकाच घेतलाय.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 30, 2023 | 08:07 AM
श्रीगोंद्यात दुधातून ‘विषप्रयोग’, आता चहाऐवजी उसाच्या रसाला मागणी; कसं बनवतात बनावट दूध? : जाणून घ्या सविस्तर
Follow Us
Close
Follow Us:

अहमदनगर : काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे दूध भेसळीचे मोठे रॅकेट अन्न – औषध प्रशासन व पाेलिसांनी नुकतेच उघड केले. तेव्हापासून येथील लोकांनी दूध व दुग्धजन्य पदार्थांचा धसकाच घेतलाय. चहाऐवजी उसाच्या रसाला मागणी वाढली आहे. ग्लासमध्ये मिळणारा रस आता लिटरमध्ये मिळू लागला आहे. त्यासाठी रिकाम्या बाटल्यांची व्यवस्था विक्रेत्यांनी केली आहे. पोलिस स्टेशननजीकच्या एका रस विक्रेत्याकडे गर्दी तर चहाच्या टपरीवर शुकशुकाट दिसला.

भेसळयुक्त दुधाचा धसका

दिव्य मराठी’ ने दिलेल्या वृत्तानुसार शासकीय यंत्रणांनीही भेसळयुक्त दुधाचा प्रचंड धसका घसका घेतला आहे. एकट्या श्रीगोंद्यात दररोज एक लाख ६० हजार लिटर दुधाचे संकलन होत असे. आता ते अवघे ६० हजारांवर आले आहे. तब्बल १ लाख लिटर दुधाचे संकलन घटले आहे. हे सर्व दूध बनावट असल्याचा पोलिसांना संशय आहे, त्यादृष्टीने ते तपास करत आहे मात्र अन्न व औषध प्रशासन म्हणते, त्यातील काही शेतकऱ्यांनी कारवाईच्या भीतीने डेअऱ्यांमध्ये दूध देणे बंद केले असावे. काही लिटर दूध मात्र भेसळ आहे हे नक्की. मात्र नेमके ते किती हे एफडीएचे अधिकारी सांगू शकले नाही.

२४ आरोपींविरुद्ध आतापर्यंत गुन्हा दाखल

काष्टी येथील दूध भेसळ प्रकरणी पोलिसांनी २४ आरोपींविरुद्ध आतापर्यंत गुन्हा दाखल केला असून १० आरोपींना अटक झाली असून १४ आराेपींचा शोध सुरु आहे. एफडीएने कारवाई केल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना विलंबाने दिल्याने या प्रकरणातील मुख्य आरोपी पसार झाला व काही कागदपत्रे जाळून टाकले, मोबाईल फेकून दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांचा भर गुटख्याच्या कारवाईवर

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मात्र हा आरोप फेटाळला. ते म्हटले भेसळ प्रकरणाचा तपास पोलिस वेगळ्याच दिशेने करताय, यावरुन शासनाच्या दोन्ही महत्त्वाच्या विभागांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येते. तपासाधिकारी समीर अभंगे यांच्या दालनात प्रवेश करताच त्यांच्या उजव्या हाताला छताला भिडतील एवढे गुटख्याचे पोते रचलेले होते. यावरुन पोलिसांचा भर गुटख्याच्या कारवाईवर असल्याचे दिसले. वास्तविक दूधात भेसळ करुन आरोग्याशी खेळ करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी या दोन्ही विभागांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे मात्र तसे होतांना दिसत नाही.

अन्नात भेसळ केल्यास पूर्वी न्यायालयात खटला दाखल व्हायचा, आता मात्र केंद्राने आपल्या कायद्यात बदल केल्याने आरोपी कारागृहातून काही दिवसात बाहेर येतात. पूर्वी गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षा होत होती आता फक्त काही रुपयांचा दंड होतो. कायद्यातही बदल करणे आवश्यक असल्याचे पोलिसांच्या बोलण्यातून दिसून आले.

काष्टीत कारवाई करण्यापूर्वी एक शेतकरी डेअरीत १५५ लिटर दूध देत होता, कारवाईनंतर त्याचे दूध ३ लिटरवर आले. तब्बल १५२ लिटर दूध घटले. यातून दुधात किती भेसळ होत होती, याचा पुरावा असल्याचीही चर्चा श्रीगोंद्यात होती. त्याबाबत पोलिसांना छेडले असता त्यांनीही या वृत्तास दुजोरा दिला.

कसे बनवतात बनावट दूध?

व्हे पावडर

सुमारे ४० लिटर पाण्यात ५ किलो व्हे पावडरचे मिश्रण केले जाते.

लिक्विड पॅराफिन

दुधात फॅटसाठी दीड लिटर घातक लिक्विड पॅराफिन मिसळतात.

व्हे पावडर बाजारात सहज मिळते. त्याचा वापर बेकरी प्रॉडक्टसाठी होतो. प्रोटीन वाढीसाठीही ते वापरले जाते. मात्र त्यापासून दूध बनवणे गुन्हा. तो सर्रास केला जातो. व्हे पावडरचा वापर बनावट दुधात एसएनएफ (सॉलिड नॉट फॅट) आणण्यासाठी. छोट्या डेअरीतील मशीनही हे बनावट दूध ओळखू शकत नाही.

मिनरल ऑइलपासून बनते लिक्विड पॅराफिन. सौंदर्य प्रसाधन निर्मितीसाठी वापर. खरेदीसाठी परवाना आवश्यक. मात्र त्यापासून दूध बनवणे आरोग्यासाठी अत्यंत घातक. बनावट दुधात फॅटचे प्रमाण वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. ही भेसळसुद्धा छोट्या डेअरीतील मशीनद्वारे ओळखता येत नाही.

Web Title: Poisoning from milk in srigondia now demand for sugarcane juice instead of tea how to make fake milk know in detail nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2023 | 07:54 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • NAVARASHTRA
  • Shrigonda

संबंधित बातम्या

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
1

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या ‘त्या’ आदेशाला हायकोर्टाची स्थगिती
2

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या ‘त्या’ आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची…; काँग्रेसचा बडा नेता संतापला
3

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची…; काँग्रेसचा बडा नेता संतापला

टोळीप्रमुखासह दहा सराईत गुन्हेगारांना केले तडीपार; पुणे पोलिसांची मोठी कारवाई
4

टोळीप्रमुखासह दहा सराईत गुन्हेगारांना केले तडीपार; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.