Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावकार दाम्पत्यावर पोलिसांची कारवाई! १० टक्के व्याजाचा नागरिकांभोवती फास; गुन्हा दाखल

भंडारा जिल्ह्यातील Pawni येथे अवैध सावकारीचा प्रकार उघडकीस आला असून सावकार दाम्पत्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 08, 2026 | 06:05 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरात अवैध सावकारीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांना तब्बल १० टक्के व्याजदराने पैसे देऊन आर्थिक पिळवणूक करणाऱ्या सावकार पती-पत्नीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात संदेश विठोबा खोब्रागडे आणि रेखा संदेश खोब्रागडे यांच्यावर महाराष्ट्र सावकारी अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. कर्जदारांकडून मुद्दलापेक्षा अनेकपटीने जास्त रक्कम वसूल करूनही त्यांना धमकावणे आणि मानसिक छळ करणे, असे गंभीर आरोप या दाम्पत्यावर आहेत. या कारवाईमुळे पवनी परिसरात खळबळ उडाली आहे.

Nanded News : अवैध रेती उत्खननावर छापे! DIGच्या पथकाची कारवाई, १ कोटी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

मणेश वॉर्डातील शैलेंद्र दिगांबर कुर्वे यांनी आरोपी संदेश खोब्रागडे याच्याकडून ३ लाख ३० हजार रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. कुर्वे यांनी आतापर्यंत केवळ व्याज म्हणूनच तब्बल ३ लाख ४३ हजार रुपये परत केले आहेत. असे असूनही आरोपीने त्यांच्याकडून आधी घेतलेल्या कोऱ्या धनादेशाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. त्या धनादेशावर स्वतःहून ३ लाख रुपये लिहून तो बँकेत जमा करण्यात आला आणि धनादेश बाऊन्स झाल्यानंतर स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पीएसआय यशोदा पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, रामपुरी वॉर्डातील विशाखा दिगांबर नागपुरे यांनीही अशाच प्रकारची तक्रार दिली आहे. त्यांनी पाच वर्षांपूर्वी आरोपी रेखा खोब्रागडे हिच्याकडून ३ लाख ५० हजार रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. फिर्यादीने आतापर्यंत व्याजासह तब्बल १३ लाख ८० हजार रुपये परत केल्याचे सांगितले आहे. मात्र इतकी मोठी रक्कम दिल्यानंतरही पूर्ण पैसे मिळाले नसल्याचा तगादा लावत आरोपीने त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली, घरातील वस्तूंची फेकाफेक केली आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातही स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला असून पीएसआय येवले पुढील तपास करत आहेत.

Amravati News : कोट्यवधी रुपये पाण्यात; मेळघाटातील बारातांडा-धूळघाट रस्ता खड्यात गडप

हे दोन्ही गुन्हे शनिवारी पवनी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. पोलिस सध्या या अवैध सावकारी प्रकरणाचा सखोल तपास करत असून आणखी पीडित समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अवैध सावकारांकडून जास्त व्याजदराने पैसे घेण्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारे कोणी आर्थिक छळ करत असल्यास घाबरून न जाता तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Police action against moneylender couple 10 percent interest is a noose around citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Bhandara

संबंधित बातम्या

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २१ वर्षांत ७८१ शेतकरी आत्महत्या! फक्त २ शेतकरी कुटुंबांनाच मदत; तब्बल ४७६ प्रकरणे ठरवली अपात्र
1

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २१ वर्षांत ७८१ शेतकरी आत्महत्या! फक्त २ शेतकरी कुटुंबांनाच मदत; तब्बल ४७६ प्रकरणे ठरवली अपात्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.