Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळ्यात चोरट्यांचा वावर, पोलिसांकडून 18 जण ताब्यात

संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळ्यात चोरट्यांचा वावर वाढला आहे. याच चोरट्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 25, 2025 | 09:34 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळ्याला उपस्थित असलेल्या भाविकांना चोरट्यांचा सामना करावा लागत आहे. या गैरप्रकारांमुळे भक्तांच्या तक्रारी वाढल्या आहेत. यातील मोबाईल चोरी आणि पैशांची लूट हे मुख्य प्रकार आहेत. स्थानिक पोलिसांनी यावर त्वरित कारवाई करून अनेक आरोपींना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी भाविकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला असून, सोहळ्याच्या परिसरात अधिक सुरक्षा तैनात केली आहे.

नगर तालुक्यातील अकोळनेर येथे संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त आयोजित गाथा पारायण आणि अखंड हरीनाम सप्ताहात वारकरी बनून आलेल्या जालना जिल्ह्यातील महिला व पुरुषांच्या टोळीने चांगलाच उच्छाद घालत अनेक महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरले. मात्र वेळीच ही बाब लक्षात आल्याने तेथे उपस्थित नागरिकांच्या मदतीने १८ जणांच्या टोळीला तालुका पोलीस पथकाने ताब्यात घेतले.

Ajit Pawar: ” कामाच्या दर्जात मला अजिबात…”; अजित पवारांची अधिकाऱ्यांना तंबी

अकोळनेर येथे १६ एप्रिल पासून हा सोहळा मोठ्या स्वरुपात सुरु होता. २३ एप्रिल रोजी या सोहळ्याची सांगता होती. त्यामुळे शेवटच्या दिवशी जिल्हाभरातील भाविकांच्या गर्दीचा उच्चांक झाला होता. दुपारी १२ च्या सुमारास गाथा पारायणाची सांगता झाली. त्यानंतर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. या गर्दीत अनेक महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांच्या चोऱ्या होऊ लागल्या, काही वेळात चोऱ्यांच्या या घटना निदर्शनास येवू लागल्या. त्यामुळे तेथे उपस्थित स्वयंसेवक सतर्क झाले. पोलिस प्रशासन आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने तब्बल १८ चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ४५ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले.

Heatwave: राज्यातील ‘या’ शहरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; प्रशासनाचे काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन

याबाबत कांचन सुधीर जाधव (वय २३, रा.अकोळनेर, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून या चोरट्यांच्या टोळी विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२), ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दागिने चोरीला गेल्याबाबत ४ महिलांनी पोलिसांना जबाब दिले असून त्यातील ३ महिलांचे १ लाख ३५ हजारांचे दागिने पोलिसांनी या चोरट्यांच्या टोळी कडून हस्तगत केले आहेत.

Web Title: Police arrested 18 people at vaikunth gaman ceremony of sant tukaram maharaj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 09:34 PM

Topics:  

  • Marathi News
  • Saint Tukaram Maharaj

संबंधित बातम्या

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
1

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण
2

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण

‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात
3

‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात

‘आफ्टर ओ.एल.सी’ मध्ये पाहायला मिळणार रहस्य, एक्शन आणि भावनांचा संगम; चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
4

‘आफ्टर ओ.एल.सी’ मध्ये पाहायला मिळणार रहस्य, एक्शन आणि भावनांचा संगम; चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.