Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलीस आयुक्त थेट उतरले रस्त्यावर; हिंजवडी वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष पाहणी करत दिल्या सूचना

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुरुवारी रस्त्यांची पाहणी केली. या दौऱ्यात वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना सुचवल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 25, 2025 | 06:40 PM
Police Commissioner Vinay Kumar Choubey inspects Hinjewadi IT Park traffic jam PCMC News

Police Commissioner Vinay Kumar Choubey inspects Hinjewadi IT Park traffic jam PCMC News

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी हा चर्चेचा विषय ठरला आहे. या ठिकाणी अनेक कंपन्या असून कर्मचाऱ्यांना येण्या-जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुरुवारी रस्त्यांची पाहणी केली. या दौऱ्यात वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना सुचवत काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक बदल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी चुकीच्या दिशेने सुरू असलेल्या वाहतुकीवर बंदी आणण्यासाठी सुरक्षा कठडे (बॅरिकेड्स) बसविण्यात आले. काही रस्त्यांवर एकेरी वाहतुकीचा प्रयोग, वाहतूक वळवणे, अतिक्रमण हटवणे आणि वाहतूक सुलभ करण्यासाठी रोहित्र (डीपी) हटवण्याच्या सूचना करण्यात आल्या. या उपाययोजनांमुळे तरी हिंजवडी भागातील वाहतूक कोंडी सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

या पाहणी दौऱ्यात सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, पीएमआरडीएचे अपर आयुक्त दीपक सिंगला, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील, परिमंडळ तीनचे उपायुक्त विशाल गायकवाड, वाकडचे सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे तसेच #UnclogHinjawadiITPark मोहिमेचे समन्वयक सचिन गुणाले आणि सचिन लोंढे सहभागी होते. याशिवाय महावितरण, पीएमपीएमएल व एमआयडीसीचे अधिकारीही उपस्थित होते.

महत्वाच्या ठिकाणी केलेल्या पाहणीत काही सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये वाहतूकमध्ये आणि रस्त्यांमध्ये थोडेफार बदल सुचवण्यात आले आहेत. ते बदल पुढीलप्रमाणे-

  • हिंजवडी वाहतूक कार्यालयाजवळील महावितरणचे डीपी हटवण्याचे निर्देश, जेणेकरून सेवा रस्त्यावरील फ्री लेफ्ट खुला होईल.
  • जांभुळकर चौक व इंडियन ऑईल चौकातील सर्कल अर्धवट करण्याचा प्रस्ताव.
  • शेल पेट्रोल पंप चौकात विरुद्ध दिशेने वाहतूक बंद.
  • माइंडट्री कन्सल्टिंग चौकात वाहतूक उपाययोजनांचा आढावा.
  • डॉलर्स कंपनीजवळील नाल्यावरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश.
  • एमआयडीसी सर्कल येथे सुरक्षा कठडे लावून वाहनांची उलटी वाहतूक रोखण्याची कारवाई.
  • मेगा पोलीस सर्कल येथे बससाठी स्वतंत्र व्यवस्था.
  • माण रस्त्यावरील पांडवनगर येथील अतिक्रमण काढण्यात आले असून उर्वरित अतिक्रमण हटवण्याचे आदेश.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

५७ पानी सविस्तर अहवाल सादर

हिंजवडी आयटी पार्क अनक्लोग करा’ मोहिमेअंतर्गत सादर करण्यात आलेल्या ५७ पानी अहवालात नागरिकांच्या सह्या, वाहतूक कोंडीची ठिकाणं आणि उपाययोजना यांचे जिओ-टॅगिंग केलेले आहे. हे सूचक दस्तावेज पोलिस आयुक्त विनय चौबे यांना हिंजवडी पोलिस ठाण्यात सादर करण्यात आले. या मोहिमेमुळे पुढील तीन ते चार महिन्यांत वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असा विश्वास मोहिमेचे संयोजक सचिन लोंढे यांनी व्यक्त केला.

वाहतूक बदल प्रायोगिक तत्त्वावर

हिंजवडी परिसरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही मार्गांवर एकेरी वाहतूक, वाहतूक वळवण, बॅरिकेड्स बसवणे, आणि चौक सुधारणा यांसारखे बदल एक महिन्याच्या प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात येणार आहेत.

Web Title: Police commissioner vinay kumar choubey inspects hinjewadi it park traffic jam pcmc news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 06:40 PM

Topics:  

  • Maharashtra Police
  • PCMC News
  • Pune Traffic Police

संबंधित बातम्या

अन् तिच्या प्रेमापोटी आई-वडील पुन्हा आले एकत्र ..! घर सोडून जाण्याच्या दहावीच्या विद्यार्थीनीच्या मदतीला धावल्या ‘दामिनी दीदी’
1

अन् तिच्या प्रेमापोटी आई-वडील पुन्हा आले एकत्र ..! घर सोडून जाण्याच्या दहावीच्या विद्यार्थीनीच्या मदतीला धावल्या ‘दामिनी दीदी’

Crime News Updates : अकोल्यात सरपंचाला बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?
2

Crime News Updates : अकोल्यात सरपंचाला बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

Viral Video : रील्ससाठी काय पण ! रिक्षाच्या टपावर बसून बनवली रील; तुर्भे पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हे दाखल
3

Viral Video : रील्ससाठी काय पण ! रिक्षाच्या टपावर बसून बनवली रील; तुर्भे पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हे दाखल

Latur Crime : दरोडेखोरांना पकडण्यात पोलीसांना यश; औसा भादा पोलिसांसह नागरिकांचा होणार सन्मान
4

Latur Crime : दरोडेखोरांना पकडण्यात पोलीसांना यश; औसा भादा पोलिसांसह नागरिकांचा होणार सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.