Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर; चर्चांना उधाण

बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला वाल्मिक कराड याचे पोस्टर झळकल्याचे दिसून आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 02, 2025 | 02:22 PM
मोठी बातमी ! पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर; चर्चांना उधाण

मोठी बातमी ! पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर; चर्चांना उधाण

Follow Us
Follow Us:

बीड : भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा सुरु आहे. दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित आहेत. पंकजा मुंडे सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टरने मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाल्या. त्यांनी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले, पूजा व आरती केली. यावेळी धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांचीही उपस्थिती आहे. मुंडे समर्थक आणि भगवान बाबा भक्त मोठ्या संख्येने या मेळाव्याला हजर राहिले आहेत. अशातच आता या दसरा मेळाव्यात यंदा एक वादग्रस्त प्रसंग घडल्याने चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.

बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला वाल्मिक कराड याचे पोस्टर झळकल्याचे दिसून आले. या पोस्टरवर “We support walmik anna, कराड आमचे दैवत” असा मजकूर झळकत आहे, कराडच्या समर्थकांनी हे पोस्टर झळकल्याची माहिती समोर येत आहे. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकल्याने चर्चांना उधाण आले आहे.

अंजली दमानिया यांची टीका

याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रीया दिली आहे. त्या म्हणाल्या की, मला हे ऐकून अतिशय धक्का बसला आहे. एक सुद्धा बॅनर झळकला असेल तर आपण सर्वांनी मान शरमेने खाली घालणे गरजेचे आहे. या राजकारणात आता इतकी विकृती आलेली आहे. लोकांच्या मानसिकतेत इतकी विकृती आली आहे. इतक्या खालच्या दर्जाची कृत्य करून सुद्धा या लोकांचे अशा पद्धतीचे बॅनर झळकत असतील तर पंकजा मुंडे यांना घेराव घालून हा याबाबत प्रश्न विचारला पाहिजे. यावर तुमचे म्हणणे काय? पंकजा मुंडेंना वैयक्तिकरित्या वाल्मीक कराड यांच्या बाबत काय वाटते? असे प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारले पाहिजे. धनंजय मुंडे यांना याबाबत विचारून काही फायदा नाही, कारण ती गॉन केस आहे, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

धनंजय मुंडेंच्या शायरीने वेधलं लक्ष

धनंजय मुंडेंनी आजच्या भाषणात एका शायरीन सगळ्यांचं लक्ष वेधलं. यामध्ये आग लगी थी मेरे घर, सब पुछने वाले आये हाल पूछा और चले गये… एक सच्चे मित्र ने पूछा क्या बचा है? मैने कहाँ कुछ नहीं केवल मैं बचा गया हूँ…फिर उसने गले लगा कर कहाँ दोस्त…फिर जला ही क्या हैं?, अशी शायरी धनंजय मुंडेंनी बोलावून दाखवली.

Web Title: Posters of valmik karad have been displayed at pankaja mundes dussehra gathering

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 02:15 PM

Topics:  

  • dhananjay munde
  • Pankaja Munde
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे
1

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे

‘एका आरोपीला पोलिसांनी वाचवलंय का?’ विलास घुले हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप
2

‘एका आरोपीला पोलिसांनी वाचवलंय का?’ विलास घुले हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.