Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat Saidongar Deforestation : ‘पर्यावरण मंत्र्यांना खात्याचं ज्ञान आहे का?’ कर्जतमधील वृक्षतोड पाहून सयाजी शिंदे संतापले!

Karjat Saidongar Deforestation : कर्जतच्या सायडोंगर परिसरातील हजारो झाडांची कत्तल पाहून अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला. पर्यावरण मंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी झाडे वाचवण्यासाठी नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

  • By विवेक
Updated On: Nov 08, 2026 | 04:59 PM
Sayaji Shinde on Karjat Saidongar Deforestation

Sayaji Shinde on Karjat Saidongar Deforestation

Follow Us
Follow Us:
  • कर्जतमधील वृक्षतोड पाहून सयाजी शिंदे संतापले
  • पर्यावरण मंत्र्यांवर साधला निशाणा
  • टोरेंट कंपनीच्या गाड्या अडवण्याचे नागरिकांना आवाहन
 

कर्जत : कर्जतमधील सायडोंगर येथे टोरंट प्रकल्पानिमित्त झालेल्या वृक्षतोडीवरून झालेला वाद काही सामन्याचा नाव घेत नाही आहे. कर्जतमधील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि विरोधकांनी वृक्षतोडीवरून आक्रमक भूमिका घेत महायुती सरकारला घेरलं आहे. वेगवेगळ्या स्तरावरून वृक्षतोडीला विरोध सुरूच असून अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. (Karjat Saidongar Deforestation)

यावेळी त्यांनी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. “हजारो झाडांची कत्तल होत असताना पर्यावरणमंत्री शांत का आहेत? मंत्र्यांना खातं देताना त्यांना खात्याचं ज्ञान आहे का हे पाहणं गरजेचं आहे,” असं ते यावेळी म्हणाले.

विकासाच्या नावाखाली हजारो झाडांवर कुऱ्हाड चालवली जात असेल, तर पर्यावरणाचं रक्षण करणार कोण? असा सवाल उपस्थित करत सयाजी शिंदे यांनी कर्जतमधील वृक्षतोडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कर्जत तालुक्यातील पालीतर्फे कोतवाल खलाटी येथील सायडोंगर परिसरात सुरू असलेली वृक्षतोड पाहिल्यानंतर त्यांचा संताप अनावर झाला. यावेळी कर्जत पर्यावरण बचाव समितीचे समन्वयक अॅड. कैलास मोरेही उपस्थित होते.

Gokul Politics : गोकुळवरून कोल्हापूर पेटलं! शासनाचा पुतळा जाळला, कोल्हापुरात दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर

‘झाडांना श्रद्धांजली वाहायला आलोय!’

झाडं तोडली जातात, पण त्यांच्या मृत्यूवर कुणी शोकसभा घेत नाही, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली. ही झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात. त्यामुळे या ठिकाणी झाडांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

80 प्रकारच्या पक्ष्यांचं घर उद्ध्वस्त?

सायडोंगर परिसरातील जुन्या झाडांवर जवळपास 80 प्रकारचे पक्षी राहत असल्याचा दावा शिंदे यांनी केला. झाडांची कत्तल झाल्यामुळे पक्ष्यांच्या अधिवासाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्या प्रजनन काळाचाही विचार केला गेला नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

झाडांवर अवलंबून असलेली जैवविविधता नष्ट झाली, तर पक्ष्यांच्या अन्नसाखळीवरही परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. जंगलतोड करून प्रकल्प उभारण्यापेक्षा पर्यावरणाचं रक्षण महत्त्वाचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

‘कोट्यवधी झाडं लावली, मग ती दिसतात कुठे?’

सरकार कोट्यवधी झाडं लावल्याचा दावा करतं, मग ती झाडं नेमकी कुठे आहेत, असा सवाल सयाजी शिंदे यांनी उपस्थित केला. सूर्यप्रकाश आणि निसर्गाची ऊर्जा मोफत उपलब्ध असताना जंगलांचा नाश करून विकास साधण्याची गरज काय, असाही प्रश्न त्यांनी विचारला. प्रकल्पग्रस्त म्हणून स्वतःलाही चौकीदाराची नोकरी करावी लागल्याचा अनुभव सांगत त्यांनी रोजगाराच्या आश्वासनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

वृक्षतोडीवरून महायुतीतही तिढा?

या वृक्षतोडीवरून राज्यात वातावरण तापलं असतानाच महायुतीतदेखील एकमत नसल्याचं दिसत आहे. शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांच्यात झालेल्या वादावरून हे स्पष्टदेखील झाले.

महेंद्र थोरवे यांनी प्रकल्पाच्या बाजूने भूमिका मांडली असून या प्रकल्पामुळे स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटेल असं म्हंटल आहे. दुसरीकडे, राष्ट्र्वादीच्या सुधाकर घारे यांनी वृक्षतोड आणि स्थानिकांच्या प्रकल्पास असलेल्या विरोधाला लक्षात घेत प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अश्यातच, आता सयाजी शिंदे यांनी थेट राज्य सरकार आणि पर्यावरणमंत्र्यांवरच निशाणा साधल्याने चर्चाना उधाण आले आहे.

अखेर, राज्यात दुष्काळी परतस्थिती असल्यामुळे तसेच पर्यावरणावरून वृक्षतोडीच्या निषेधार्थ यंदा दिवाळी साजरी करू नका, असं भावनिक आवाहन शिंदे यांनी नागरिकांना केलं. सायडोंगरातील वृक्षतोडीचा मुद्दा आता पर्यावरणाच्या चर्चेसोबतच स्थानिक आंदोलनाचाही विषय बनला आहे.

‘तटकरे खोटे आणि कपटी माणूस’, अजितदादांच्या निधनानंतर आमदारांना फोन केले? महेंद्र थोरवेंच्या दाव्याने राजकारणात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीचा निषेध कुठे केला?

    Ans: कर्जत तालुक्यातील पालीतर्फे कोतवाल खलाटी येथील सायडोंगर परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीचा सयाजी शिंदे यांनी निषेध केला.

  • Que: सयाजी शिंदे यांनी पर्यावरण मंत्र्यांवर काय टीका केली?

    Ans: हजारो झाडांची कत्तल सुरू असताना पर्यावरण मंत्री गप्प असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला. मंत्र्यांना त्यांच्या खात्याची माहिती असणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.

  • Que: सयाजी शिंदे यांनी नागरिकांना कोणतं आवाहन केलं?

    Ans: वृक्षतोड रोखण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं. तसेच झाडांच्या कत्तलीच्या निषेधार्थ यंदा दिवाळी साजरी करू नका, असंही ते म्हणाले.

Web Title: Karjat saidongar deforestation sayaji shinde environment protest vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • Environment Department
  • karjat news
  • Pankaja Munde
  • Sayaji Shinde

संबंधित बातम्या

Sayaji Shinde: जमिनीच्या रक्षणासाठी एकजूट दाखवा! सयाजी शिंदे यांचे पाली सायडोंगर ग्रामस्थांना आवाहन
1

Sayaji Shinde: जमिनीच्या रक्षणासाठी एकजूट दाखवा! सयाजी शिंदे यांचे पाली सायडोंगर ग्रामस्थांना आवाहन

Karjat Torent Project : टोरंट प्रकल्पावरून भाजप आक्रमक! ‘बाहेरच्यांनी येऊन लुडबुड करू नये’, दिला थेट इशारा
2

Karjat Torent Project : टोरंट प्रकल्पावरून भाजप आक्रमक! ‘बाहेरच्यांनी येऊन लुडबुड करू नये’, दिला थेट इशारा

Karjat Saidongar Deforestation : टोरंट कंपनीकडून भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीला कोट्यवधींचा निधी! प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट
3

Karjat Saidongar Deforestation : टोरंट कंपनीकडून भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीला कोट्यवधींचा निधी! प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.