Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जतमध्ये वीजपुरवठ्याचा गोंधळ कायम; संघर्ष समितीचा तीव्र इशारा

कर्जत शहरात वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून संघर्ष समितीने महावितरणला आंदोलनाचा इशारा दिला आहे. मे अखेरपर्यंत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीने दिला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 29, 2025 | 09:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

कर्जत शहर व तालुक्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले असून, याविरोधात कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने २९ एप्रिल रोजी महावितरणच्या कार्यालयात अचानक धडक दिली. या आंदोलनामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची धांदल उडाली. समितीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, येत्या मे महिन्याच्या आत वीज समस्येवर उपाय न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.

Shrikant Shinde : “पहलगाम पिडितांचा अवमान करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करा”, श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसला खडसावले

गेल्या काही आठवड्यांपासून शहरात दिवस व रात्र अशा दोन्ही वेळेस वीज पुरवठा खंडित होत असल्याने सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२४ मध्येही यासंदर्भात आंदोलन झाले होते, मात्र त्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. सोशल मीडियावरून नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने महावितरणचे उपअभियंता चंद्रकांत केंद्रे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात ॲड. कैलास मोरे, रंजन दातार, राजेश लाड, दीपक बेहरे, स्विटी बार्शी आदी सदस्य सहभागी होते. त्यांनी म्हटले की, गेल्या वर्षी महावितरणने लेखी आश्वासन दिले होते, परंतु प्रत्यक्षात काहीच सुधारणा झालेली नाही. वीज खंडित होण्याबाबत ना कोणतीही पूर्वसूचना दिली जाते ना त्याचे कारण स्पष्ट केले जाते.

Ajit Pawar: “माळशेज घाटात स्कायवॉक झाल्यास…”; काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?

महावितरणचे उपअभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, काही दिवसांपूर्वी इन्कमरमध्ये बिघाड झाल्याने वीज खंडित झाली होती. वंजारवाडी फिडर बंद नव्हता, मात्र नगरपरिषदेच्या तांत्रिक समस्येमुळे पाणीपुरवठा अडथळीत झाला असावा. एक्सप्रेस फिडरचं काम सुरू करण्यासाठी नगरपरिषदेनेच पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. संघर्ष समितीचे ॲड. कैलास मोरे यांनी इशारा दिला की, यापुढील आंदोलन लोकशाही मार्गाने नसेल. जर वेळेत उपाय झाले नाहीत, तर महावितरणला जनतेच्या उद्रेकासाठी जबाबदार धरले जाईल.

Web Title: Power supply disruption continues in karjat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 09:27 PM

Topics:  

  • Karjat
  • karjat news

संबंधित बातम्या

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान
1

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट
2

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट

Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
3

Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Karjat News : “धरण नको पण…”, ‘या’ प्रकल्पाला गावकऱ्यांचा तीव्र विरोध, न्यायलयाच्या निर्णयावर व्यक्त केला संताप
4

Karjat News : “धरण नको पण…”, ‘या’ प्रकल्पाला गावकऱ्यांचा तीव्र विरोध, न्यायलयाच्या निर्णयावर व्यक्त केला संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.