Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तुमचं आणि काँग्रेसचं जागावाटप काय झालं ते सांगावं, तरच….”, प्रकाश आंबेडकरांचे मविआतील जागावाटपावरून शिवसेनेला खोचक सवाल

  • By युवराज भगत
Updated On: Jan 08, 2024 | 02:53 PM
“तुमचं आणि काँग्रेसचं जागावाटप काय झालं ते सांगावं, तरच….”, प्रकाश आंबेडकरांचे मविआतील जागावाटपावरून शिवसेनेला खोचक सवाल
Follow Us
Follow Us:
Prakash Ambedkar on Shiv Sena : महाराष्ट्रातील विधान सभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. तसेच, लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना मविआच्या जागा वाटपावरून चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. असे असताना शिवसेना आणि वंचितची युती झालेली आहे. तरीदेखील प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेला खोचक सवाल करीत इशारा दिला आहे. दुसरीकडे एकीकडे सत्ताधारी शिंदे गट व अजित पवार गट यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असताना दुसरीकडे दोन्ही बाजूच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून सुंदोपसुंदी चालू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत 
ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी वंचितच्या मविआतील सहभागाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल सूचक विधान केलं होतं. “शिवसेना हा मविआमधला प्रमुख घटक पक्ष आहे. आमच्याबरोबर आता वंचितची युती आहे. त्यामुळे आम्ही असं मानतो की वंचितही मविआची घटक आहे. लोकसभेच्या दृष्टीने सध्या चर्चा चालू आहे. प्रकाश आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांना सन्मानाने मविआमध्ये सहभागी करण्यासंदर्भात आत्तापर्यंत किमान ६ ते ७ वेळा सकारात्मक चर्चा झाली आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांना जोरदार टोला
महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत बोलताना संजय राऊतांनी वंचित बहुजन आघाडी मविआमध्ये सहभागी होण्याबाबत आश्वासक विधान केल्यानंतर त्यावर आता प्रकाश आंबेडकरांनीच खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
अकोल्याच्या जागेवरून संजय राऊतांचे महत्त्वाचे विधान
“अकोल्याची जागा परंपरेनं प्रकाश आंबेडकरच लढतात. त्यांनीच ती लढावी. आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी आहोत. याशिवाय वंचितचे उमेदवार कुठे उभे करता येतील, यावर चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे”, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
शिवसेनेला खोचक सवाल
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी यासंदर्भात उत्तर देताना ठाकरे गटाला व पर्यायाने उद्धव ठाकरेंना खोचक सवाल केला आहे. “माझी या सगळ्या पक्षांना थेट ऑफर आहे. अकोला हा मतदारसंघ काही फार महत्त्वाचा नाही. मी लढलो किंवा नाही लढलो तरी त्यानं फार फरक पडत नाही. ज्या कुठल्या पक्षाला अकोला लढायचंय, त्यांनी लढावं. त्यांच्यासाठी आम्ही काम करू. पण तुमचा जागावाटपाचा फॉर्म्युला तरी बाहेर येऊ द्या. वंचित हे काही त्यातलं लक्ष्य नाही”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
……तरच आम्ही शिवसेनेसोबत 24-24 जागा लढवू
“तुमचं आणि काँग्रेसचं जागावाटप काय झालं ते सांगावं. तेही नसेल, तर किमान राष्ट्रवादीबरोबर तुमचं जागावाटपाचं काय ठरलंय, ते तरी शिवसेनेनं लोकांना सांगावं. आमच्याबरोबर चर्चा झालेला फॉर्म्युला म्हणजे इतर दोन पक्षांबरोबर त्यांचं काही ठरलं नाही, तर आम्ही व शिवसेना २४-२४ जागा लढवू. अकोल्याची जागा कुठल्याही पक्षानं लढावी, जो लढेल त्याला मी जिंकून आणेन. त्यांनी अकोल्याचा बाऊ करून स्वत:वरच्या जबाबदाऱ्या बाजूला करू नयेत”, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे गटाला दिला.
आम्हाला पूर्ण ४८ जागा लढाव्या लागतील
“जागावाटपावर आजपर्यंत का निर्णय झाला नाही याचं प्रामाणिकपणे उत्तर त्यांनी जनतेला द्यावं. नसेल तर त्यांनी सरळ जनतेला सांगावं की २४ जागा ते लढतील, २४ जागा आम्ही लढवू. विषय सुटेल. आघाडी झाली नाही तर आम्हाला पूर्ण ४८ जागा लढाव्या लागतील. त्यामुळे आमची तयारी त्या दृष्टीने चालू आहे. त्यांनी मोदीचं ऐकलं, तर जेलच्या बाहेर. माझं ऐकलं तर जेलच्या आत. मग कुणाचं ऐकतील ते तुम्हीच ठरवा”, असं सूचक विधान प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केलं.

Web Title: Prakash ambedkar asked shiv sena about seat allocation in maviya tell me what happened to seat allocation between you and congress nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2024 | 02:52 PM

Topics:  

  • Legislative Assembly election
  • Mahavikas Aghadi
  • Prakash Ambedkar

संबंधित बातम्या

Gokul Election: गोकुळ निवडणुकीत महायुतीचा दावा; ‘२५-०’ मतांनी सत्ता मिळवणार
1

Gokul Election: गोकुळ निवडणुकीत महायुतीचा दावा; ‘२५-०’ मतांनी सत्ता मिळवणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.