
President Draupadi Murmu visits Maharashtra, will visit Gajanan Maharaj mandir
शेगाव मधील संत गजानन महाराज यांचे मंदिर हे व्यवस्थापन आणि मंदिर परिसरातील स्वच्छता यासाठी ओळखले जाते. मंदिराची ख्याती संपूर्ण देशामध्ये पसरली आहे. या मंदिरामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दर्शनासाठी येणार आहेत. त्यामुळे मंदिर परिसराची पूर्ण पाहणी केली जात आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतली जात आहे. या दौरासाठी राज्यातील 10 जिल्ह्यातील पोलीस शेगावात तैनात करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या दौर्यामुळे संपूर्ण शेगाव शहरात उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : तब्बल ४८१ रिक्त पदांमुळे महापालिकेत प्रभारीराज; बिंदू नामावलीचा ठोस आराखडा असणे गरजेचे
शेगाव मंदिरामध्ये आत्तापासून पोलीस तैनात करण्यात आले आहे. येणाऱ्या प्रत्येक भाविकाची कसून तपासणी जात आहे. येत्या 25 फेब्रुवारी रोजी महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या शेगाव दौऱ्यावर येणार असून यामुळे श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरातील भाविकांना दर्शनाच्या वेळेत काही बदल करण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या निर्देशानुसार त्यांना सर्वोच्च राज शिष्टाचार प्रदान करण्यात आलेला असल्याने सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून खबरदारीचे उपाय सूचविण्यात आले आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शेगावमधील दर्शनामुळे मंगळवार २४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रशासनाचे वतीने रंगीत तालीम घेण्यात येणार असून श्रींचे दर्शन सकाळी १०.३० ते १२.०० वाजोपर्यंत स्थगित राहील. त्याचप्रमाणे बुधवार २५ फेब्रुवारी २०२६ रोजी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे श्री दर्शनास आगमन होत असल्याने श्रींचे दर्शन सकाळी ७.३० ते दु. १२.३० वा. पर्यंत स्थगित राहणार आहे. त्यानंतर श्री दर्शन व्यवस्था ही पूर्ववत सुरु राहील, याची भाविकांनी नोंद घ्यावे असे आवाहन संस्थांकडून करण्यात आले आहे. तर संस्था आणि प्रशासनास सहकार्य करावे, असेही नम्र विनंती श्री गजानन महाराज संस्थान शेगावच्या वतीने करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : भाजप कार्यकारणीत मोठा ट्वीस्ट; सुप्रिया सुळे यांचे भावी व्याही अरूण लखानी यांची वर्णी