Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य द्यावे; डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचं आवाहन

नगरपालिकेने शहरातील खड्डे तात्काळ बुजवावेत, चंद्रभागा वाळवंटात अतिक्रमणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आवश्यक ठिकाणी बॅरकेंटींग करावे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 06, 2024 | 10:43 AM
कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य द्यावे; डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचं आवाहन

कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य द्यावे; डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचं आवाहन

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून लाखो वारकरी भाविक येतात. 12 नोव्हेंबर 2024 रोजी कार्तिकी एकादशी असून, यात्रेचा कालावधी 2 ते 15 नोव्हेंबर 2024 असून, वारी कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य देऊन आवश्यक उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

हेदेखील वाचा : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी आज महाराष्ट्रात; सकाळी नागपुरात तर सायंकाळी मुंबईत सभा

कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्तिकी यात्रा सोहळा यशस्वी व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी. नगरपालिकेने यात्रा कालावधीत स्वच्छतेसाठी जादा स्वच्छता कर्मचारी यांची उपलब्धता, टॉयलेट स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था आदी कामे तात्काळ करावीत.

पोलीस प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे तसेच मंदीर समितीनेही जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी. मंदीर समिती पत्राशेड, दर्शन रांग तसेच दर्शन रांगेमध्ये उभारलेल्या तात्पुरत्या उड्डाणपुलाचे स्ट्रक्चर ऑडीट, फायर ऑडिट व इलेक्ट्रिक ऑडीट करुन घ्यावे. आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना ज्याप्रमाणे आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या होत्या त्याप्रमाणेच कार्तिकी यात्रा कालावधीतही सुविधा उपलब्ध करुन कार्तिकी यात्रा सोहळा पार पाडावा, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, नगरपालिकेने शहरातील खड्डे तात्काळ बुजवावेत, चंद्रभागा वाळवंटात अतिक्रमणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आवश्यक ठिकाणी बॅरकेंटींग करावे. तसेच अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांची तसेच प्रसादलयाच्या दुकानांची तपासणी करण्यासाठी जादा पथकाची नेमणूक करावी.

औषधोपचार केंद्रांची व बाईक ॲब्युलन्सची संख्या वाढवली

मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम म्हणाले, कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांना आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुबलक औषध पुरवठ्यासह औषधोपचार केंद्रांची व बाईक ॲब्युलन्सची संख्या वाढविण्यात आली असून तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच कार्तिकी यात्रा कालावधीत वाखरी येथे जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याने जनावरांच्या औषधोपचार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथके नेमण्यात आली आहेत.

हेदेखील वाचा : गायिका शारदा सिन्हा यांचे निधन, सहा वर्षांपासून ‘या’ गंभीर आजाराने होत्या त्रस्त, जाणून घ्या लक्षणे

Web Title: Prioritize sanitation along with health facilities of devotees during the kartiki yatra period says dr chandrakant pulkundwar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 10:42 AM

Topics:  

  • Kartiki Yatra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.