गायिका शारदा सिन्हा यांचे निधन
5 नोव्हेंबरला भोजपुरी गायिका लोक गायिका शारदा सिन्हा यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जवळचे मित्र, कुटुंबीयांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे. त्यांनी मैथिली आणि भोजपुरी या भाषेत अनेक गाणी गायली आहे. शिवाय शारदा सिन्हा यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये एकूण 9 अल्बममध्ये 62 छठ गाणी गायली. लोक छठचा सण त्यांच्या गाण्याशिवाय अपूर्ण मानतात. मात्र छठचा आधीच त्यांचे निधन झाल्यामुळे दुःख व्यक्त केले जात आहे. शारदा सिन्हा या मागील अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होत्या. मात्र ५ नोव्हेंबरला त्यांची प्राणज्योत मालवली. शारदा सिन्हा नक्की कोणत्या आजाराने त्रस्त होत्या? या आजाराची लक्षणे काय? चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
मल्टिपल मायलोमा हा कर्करोगासंबंधित आजार आहे. तसेच हा आजार रक्तवाहिन्यांसंबंधित आजार आहे. या आजारांमध्ये प्लाझ्मा पेशी पांढऱ्या रक्त पेशी संसर्ग टाळण्यासाठी अँटीबॉडीज तयार करतात. पण मायलोमामध्ये, पेशी नियंत्रणाच्या बाहेर वाढू लागतात. सामान्य पेशी अस्थिमज्जा मध्ये वाढतात ज्यामुळे लाल रक्तपेशी, प्लेटलेट्स आणि इतर पांढऱ्या रक्तपेशी तयार होऊ लागतात. तयार झालेल्या पेशी अस्थिमज्जामध्ये आणि प्रतिरक्षा प्रणालीचा भाग आहेत. या सगळ्याचा रक्तपेशींवर मोठा परिणाम दिसून येतो.
हे देखील वाचा: हिवाळा ठरू शकतो आरोग्यासाठी त्रासदायक! ‘अशा’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी
मल्टिपल मायलोमा झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येतात. पण ही लक्षणे वेळीच ओळखून आरोग्याची काळजी घेतली आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार केले तर आजार बरा होऊ शकतो. या आजाराची लक्षणे दिसू लागल्यानंतर संपूर्ण रक्त गणना, क्रिएटिनिन, कॅल्शियम,मूत्र चाचण्या, पीईटी सीटी, एक्स-रे आणि बोन मॅरो इत्यादी चाचण्या करण्यास सांगितले जाते. या चाचण्या कर्करोग शोधण्यास मदत करतात. बोन मॅरो बायोप्सी अस्थिमज्जामध्ये सामान्य आणि असामान्य प्लाझ्मा पेशींची टक्केवारी जाणून घेण्यास मदत करतो.
हे देखील वाचा: धूम्रपान सोडायचा विचार करताय? फॉलो करा ‘या’ टिप्स
कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे निदान झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. मल्टिपल मायलोमा झाल्यानंतर स्टिरॉइड्स, इम्युनोमोड्युलेटर्स आणि टार्गेटेड थेरेपी इत्यादी उपचार केले जातात. तसेच या आजाराने व्यवस्थपन करण्यासाठी डॉक्टरांद्वारे औषधे आणि ॲंटीबायोटिक्स दिली जातात. कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी स्टिरॉइड्स सुद्धा दिले जाते. या आजाराचे वेळीच निदान झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार होण्यास मदत होते.मल्टिपल मायलोमा झाल्यानंतर संतुलित आहार घेणे, शरीराला विश्रांती देणे, धूम्रपान न करणे, डॉक्टरांच्या सल्ल्याने देण्यात आलेल्या औषधांचे योग्य वेळी सेवन करणे, मानसिक तणाव कमी करणे, नैराश्याचे व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला जातो.