Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय, थेट विधानपरिषदेतच मुद्दा गाजला; गृहराज्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आश्वासन

महाराष्ट्र हे विद्येचे माहेरघर आहे. मात्र, आज पुण्यासारख्या शहरांत शिक्षणासाठी येणारी तरुण पिढी स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकारांत बरबाद होत आहे. हे केवळ स्पा नसून अमली पदार्थ आणि मानव तस्करीचे अड्डे बनले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 19, 2026 | 12:24 PM
महायुतीत वादाची पुन्हा ठिणगी; शिवसेना आणि राष्ट्रवादी 'या' मुद्यावरून आमनेसामने

महायुतीत वादाची पुन्हा ठिणगी; शिवसेना आणि राष्ट्रवादी 'या' मुद्यावरून आमनेसामने

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यातील महानगरांमध्ये, विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या शैक्षणिक व आयटी हबमध्ये ‘स्पा आणि वेलनेस सेंटर्स’च्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापार आणि मानवी तस्करीचा मुद्दा विधान परिषदेत गाजला. आमदार अमित गोरखे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या महत्वाच्या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावर उत्तर देताना, स्पा व्यवसायासाठी पुढील ३ ते ४ महिन्यांत स्वतंत्र आणि कडक नियमावली लागू केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.

सभागृहात बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, महाराष्ट्र हे विद्येचे माहेरघर आहे. मात्र, आज पुण्यासारख्या शहरांत शिक्षणासाठी येणारी तरुण पिढी स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकारांत बरबाद होत आहे. हे केवळ स्पा नसून अमली पदार्थ आणि मानव तस्करीचे अड्डे बनले आहेत. पोलीस कारवाई करतात, पण दोन दिवसांत तेच मालक नव्या नावाने सेंटर सुरू करतात. विमाननगरमधील पीडित महिलेचा मृत्यू ही देखील गंभीर घटना आहे.

गुन्हेगारी साखळीवर ‘मकोका’ लावण्याची मागणी

पिंपरी-चिंचवडमधील नायडू, पटेल, शेख, फकीर, अधिकारी, बांदोडकर अशा अनेक ठराविक लोकांची एक संघटित साखळी हा काळा बाजार चालवत असल्याचा खळबळजनक आरोप आमदार गोरखे यांनी केला. केवळ कर्मचाऱ्यांवर गुन्हे न नोंदवता, या ‘मास्टरमाइंड्स’च्या मालमत्तांची चौकशी करून त्यांच्यावर ‘मकोका’अंतर्गत कठोर कारवाई करावी, स्पा व्यवसायासाठी ‘शॉप ॲक्ट’ ऐवजी स्वतंत्र नियमावलीची मागणी देखील आमदार अमित गोरखे यांनी केली.

सरकारची सकारात्मक भूमिका

आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार एक समिती गठीत करण्यात आली आहे. नगरविकास आणि ग्रामविकास विभागाचा अहवाल लवकरच सादर होईल. पुढील ३-४ महिन्यांत स्पा सेंटरसाठी कडक निकष असलेली नवीन नियमावली लागू केली जाईल. तसेच, जे एजंट महिलांना अशा दलदलीत ढकलतात, त्यांच्यावर मुळापासून कारवाई केली जाईल आणि गरज पडल्यास ‘मकोका’ लावण्याबाबतही शासन सकारात्मक विचार करेल.

हेदेखील वाचा : “पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांना…”; मंत्री पंकजा मुंडेंची माहिती

Web Title: Prostitution under the guise of a spa issue raised in legislative council

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • Prostitution Case
  • Yogesh Kadam

संबंधित बातम्या

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल
1

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.