गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकताना देहव्यापार चालवणारी मुख्य महिला, तिच्यासोबत कार्यरत ३ तरुणी आणि २ ग्राहकांना ताब्यात घेतले. त्या ठिकाणावरून आक्षेपार्ह साहित्य, मोबाइल फोन आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.
वैदूर भागातील दुसऱ्या एका कारवाईत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची आरसीएफ पोलिसांनी सुटका केली. मुलीला वेश्याव्यवसायास प्रवृत केल्याच्या आरोपावरून विकी नावाच्या एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
पुलाची शिरोली येथील यादव वाडीमधील सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
मुंबईनंतर वेश्या व्यवसायात पुण्याचा क्रमांक लागत आहे. पुण्यात अनेक मोठे मासे तयार झाले आहेत. त्यावर काही वर्षांपूर्वी जरब बसणारी कारवाई झाली होती. तेव्हा ही साखळी मोडीत निघाली होती.