कुडाळमध्ये आमदार अबू आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन
कुडाळ येथे सकल हिंदू समाजाने औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. तसेच, आझमींचा पुतळा पायाने तुडवून त्यांचा निषेध करण्यात आला. आंदोलनात “निम का पत्ता कडवा है, अबू आझमी xxxx है, औरंगजेबाच्या पिलावळीचे करायचे काय?” आणि “खाली डोके, वर पाय, चले जाव पाकिस्तान चले जाव…” अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. आझमी यांच्या विधानांवर विरोध व्यक्त करत, हिंदू समाजाने आझमींच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.
कुडाळ येथील राजमाता जिजाऊ चौकात शुक्रवारी सकाळी सकल हिंदू समाजाने एकत्र येत अबू आझमी यांचा निषेध केला. यावेळी आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करीत, पुतळा पायदळी तुडवत आझमींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी हिंदू धर्म की जय अशी घोषणा देण्यात आली. यावेळी विवेक पंडित, रमाकांत नाईक, गणेश भोगटे, मंगेश चव्हाण, सुविनय दामले, प्रसाद नातू, अजय शिरसाट, बबन घुर्ये, अमेय शिरसाट, स्वरूप वाळके, लक्ष्मीकांत राणे, आनंद सावंत, रेवती राणे, सर्वेश पावसकर, प्रसन्ना गंगावणे, काशिनाथ निकम, महेश राऊळ, सागर वालावलकर, आदींसह सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Thane News : कल्याणमध्ये परप्रांतीय महिलांकडून शेतकरी कुटुंबाचा छळ, पोलिसांनाही धक्काबुक्की
औरंगजेबाने साडेतीनशे वर्षापूर्वी हिंदुस्थानावर आक्रमक केले, अत्याचार केले, अशा या औरंगजेबाबाबत अबू आझमी यांनी जी वक्तव्ये केली, त्याचा आम्ही आज सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध करीत आहोत. आझमींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करीत, त्यांचा सकल हिंद समाजाने निषेध केला आहे. राज्य व देशात अशांतता निर्माण करणारी वक्तव्ये करणा-या आझमींवर राज्य सरकारने गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांना पाकिस्तानात पाठवावे, अशी सकल हिंदू समाजातर्फे मागणी असून, याबाबतचे निवेदन प्रशासनाकडे देण्यात येणार आहे, असे रमाकांत नाईक यांनी यावेळी सांगितले. दामले म्हणाले, द्रेशद्रोही वक्तव्य करणा-या अबू आझमी यांच्यावर राज्य सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.