sanjay shirsat take side of neelam gorhe and target thackeray group
पुणे : पुणे शहरातील गणेशोत्सव हा देशभर लोकप्रिय आहे. या उत्सवात अनेक देशी – विदेशी नागरिक भेट देत असतात. पुण्यातील गणेशोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे. अनेक चांगल्या प्रथा, परंपरा या माध्यमातून सुरू झाल्या आहेत. स्त्रियांना कला, संस्कृती, परंपरा, सुरक्षा आणि संस्कार देणारा हा उत्सव आहे. स्त्रियांना समाजात वावरतांना सुरक्षितता मिळण्यासाठी महाराष्ट्र विधी मंडळाने शक्ति कायद्याचे विधयेक काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवले आहे. या कायद्याला पाठिंबा आणि समर्थन देण्यासाठी पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन या बाबात अधिकाधीक जागृती करण्यासाठी पुढे यावे. याची सुरुवात पुण्यातील मानाच्या तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाने करावी, असे आवाहन आज विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी केले. तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांच्या सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, “महिलांमध्ये असलेल्या कला, संस्कृती आणि परंपरेच्या वारशाचा हा सन्मान आहे. प्रत्येक महिलेत एक सरस्वती सुप्त अवस्थेत असते. आरोग्य, शिक्षण, कला, गायन, अभिनय, त्यांच्यातील या वैशिष्ठ्यपूर्ण सरस्वतींचा हा सन्मान होत असल्याने एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. पुणेंकरांकडून अनेक क्षेत्रांत असामान्य कामे झाली आहेत. पुण्याच्या सार्वजनिक जीवनात सकारात्मकता, सर्जनशीलता निर्माण करण्यात लोकमान्य टिळक, महात्मा फुले, महर्षी कर्वे यांचे योगदान फार मोठे आहे. यामुळे स्त्रियांना अनेक अधिकार मिळाले आहेत. महिलाना समाजात मानाचे स्थान देण्याची परंपरा गणेशोत्सवातूनच सुरू झाली. या माध्यमातून आजही पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात उल्लेखनीय काम करणार्या महिलांचा गौरव आज होतो आहे, ही समाधानाची बाब आहे. या महिलांनी त्यांच्या क्षेत्रात आजवर केलेले काम हे निश्चितच समाजोपयोगी आहे. त्यामुळे त्यांना मी त्यांच्या क्षेत्रातील सरस्वती असे या प्रसंगी संबोधन करीत आहे.”
[read_also content=”सोलापूर विद्यापीठाच्या प्र कुलगुरूपदी प्रा. डॉ. राजेश गादेवार यांची नियुक्ती https://www.navarashtra.com/maharashtra/solapur-university-vice-chancellor-prof-dr-appointment-of-rajesh-gadewar-nrdm-323349.html”]
श्री गणेशाच्या कृपाशीर्वादाने पुण्यातील विविध क्षेत्रात काम करीत असलेल्या नामवंत संस्था आणि व्यक्तींसोबत काम करीत असलेल्या प्रथितयश महिलांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. यामध्ये सिंबायोसिस संस्थेच्या संचालिका डॉ. विद्या राजीव येरवडेकर, ज्येष्ठ गायिका शैला दातार, डॉ. संजीवनी अविनाश इनामदार, अभिनेत्री गौतमी देशपांडे, सौ. वैशाली रघुनाथ माशेलकर, सौ. अनुराधा एच. के. संचेती, डॉ. स्वाती धनंजय दैठणकर यांचा आज मंडळाच्या वतीने डॉ. नीलम गोर्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सर्व सत्कारमूर्तीची छोटेखानी मुलाखत डॉ. शैलेश गुजर यांनी घेतली. त्यांच्या आयुष्यातील रंगतदार किस्से आज रसिकांना ऐकायला मिळाले. या कार्यक्रमाला शिवसेने चेशहर संघटक राजेंद्र शिंदे, संजय वाल्हेकर आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, नितिन पंडित यांनी केले.