Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम ग्रामस्थांकडून बंद! समस्यांकडे दुर्लक्ष; भरतगाव, भरतगाववाडीच्या ग्रामस्थांतून संताप

पुणे-बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम भरतगाव (सातारा) येथील ग्रामस्थांनी बंद पाडले. पुलाची उंची वाढवण्याच्या मागणीसाठी आता 'रास्ता रोको'चा इशारा देण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 13, 2026 | 09:40 PM
भरतगाव : महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम बंद करताना ग्रामस्थ

भरतगाव : महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम बंद करताना ग्रामस्थ

Follow Us
Follow Us:

 

  • महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम ग्रामस्थांकडून बंद!
  • समस्यांकडे दुर्लक्ष
  • भरतगाव, भरतगाववाडीच्या ग्रामस्थांतून संताप
टिटवेवाडी (वा.) : पुणे- बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम भरतगाव व भरतगाववाडी (ता. सातारा) येथील ग्रामस्थांनी बंद पाडले. पुलाची उंची वाढविण्यात यावी, पावसाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा करावा, या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे येथील ग्रामस्थांनी आज अखेर आक्रमक पवित्रा घेतला.

भरतगाव व भरतगाववाडी ही गावे महामार्गाच्या दोन्ही बाजूला आहेत. कमी उंचीच्या पुलामुळे येथील ग्रामस्थ, प्रवाशांना वेळोवेळी विविध समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषत: पावसाळ्यात पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे लोकांना ये- जा करणे जिकिरीचे ठरते. याबाबत ग्रामस्थ, दोन्ही ग्रामपंचायतीनी संबंधित अधिकाऱ्यांना गैरसोयीची माहिती दिली होती. पाठपुरावाही केला होता.

Satara News: इको सेव कंपनीकडून नुकसानीची पूर्ण वसुली करणार; नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचा कडक इशारा

तत्कालीन जिल्हाधिकारी, पोलिसप्रमुखांना निवेदनही दिले होते. मात्र अद्यापपर्यंत त्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज आक्रमक पवित्रा घेत सहापदरीकरणाचे काम बंद पाडले. या वेळी संबंधित विभागाचे प्रकल्प व्यवस्थापकही उपस्थित होते.

आंदोलनाचा इशारा

येत्या दिवसांत पुलाची उंची व रुंदीकरण न झाल्यास दोन्ही गावांतील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीनी महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तशा आशयाचे निवेदन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

Web Title: Pune bangalore highway work stopped by villagers in satara bharatgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 09:40 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी
1

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
2

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
3

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
4

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.