Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली; किमान वर्षभर पुरेल इतका साठा उपलब्ध

जलसंपदा विभागाने पुणे शहराला पिण्यासाठी वर्षाला १४.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर केलेला आहे. प्रत्यक्षात एका वर्षाला २०.४९ टीएमसी इतके पाणी पुणेकर वापरत आहेत. यानुसार दरमहा सरासरी दोन टीएमसी पाणी हे पुणेकरांसाठी लागत असते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 22, 2025 | 03:10 PM
खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत यंदा १०.०४ टीएमसी इतका जास्त पाणीसाठा

खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत यंदा १०.०४ टीएमसी इतका जास्त पाणीसाठा

Follow Us
Close
Follow Us:

खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत यंदा १०.०४ टीएमसी इतका जास्त पाणीसाठा

पुणे : पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमधील पाणीसाठ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मोठी वाढ झाली आहे. यानुसार खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून एकूण पाणीसाठा हा २२.९७ टीएमसी इतका झाला आहे. पाणीसाठ्याचे हे प्रमाण ७८.७७ टक्के इतके आहे. खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत यंदा १०.०४ टीएमसी इतका जास्त पाणीसाठा झाला आहे. यामुळे पुणेकरांची पिण्याच्या पाण्याच्या चिंतेतून आता किमान वर्षभर सुटका झाली आहे.

खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून गतवर्षीच्या आजच्या तारखेला एकूण केवळ १२.९३ टीएमसी इतका पाणी साठा होता. गतवर्षीच्या आजच्या तारखेच्या पाणीसाठ्याचे हे प्रमाण फक्त ४४.३६ टीएमसी इतके होते‌. यंदा त्यात ३४.४१ टक्क्यांची भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे. पुणे शहराला खडकवासला प्रकल्पांतील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या चार धरणांमधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या चार धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा हा २९.१५ टीएमसी आहे. यापैकी सध्या या धरणांमध्ये सध्या २२.९३ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

जलसंपदा विभागाने पुणे शहराला पिण्यासाठी वर्षाला १४.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर केलेला आहे. प्रत्यक्षात एका वर्षाला २०.४९ टीएमसी इतके पाणी पुणेकर वापरत आहेत. यानुसार दरमहा सरासरी दोन टीएमसी पाणी हे पुणेकरांसाठी लागत असते. त्यातच आता उपनगरांमध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील आणखी २३ गावे ही महापालिकेत समाविष्ट झाली आहेत.

या पार्श्‍वभूमीवर पुणे शहराला दरमहा दोन टीएमसीहून अधिक पाणी वापरले जात आहे. यानुसार, सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा हा आता पुणेकरांना किमान आणखी वर्षभर पुरणार आहे. परंतु आता यंदाचा पावसाळा सुरू झाल्याने, या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस आणखी वाढच होणार आहे.

खडकवासला प्रकल्पातील पाण्याची स्थिती (टीएमसीमध्ये)

– या प्रकल्पांतील एकूण उपयुक्त पाणीसाठा — २९.१५ टीएमसी

– सध्या उपलब्ध असलेला साठा — २२.९३ टीएमसी

– शहराला मंजूर पाणी कोटा (वार्षिक) — १४.६१ टीएमसी

– प्रत्यक्षात वापरले जाणारे पाणी (वार्षिक) — २०.४९ टीएमसी

– गतवर्षी आजच्या तारखेला उपलब्ध पाणीसाठा — १२.९३ टीएमसी

खडकवासला प्रकल्पांतील धरणनिहाय शिल्लक पाणीसाठा (कंसात टक्केवारी)

– टेमघर — २.७४ टीएमसी (७३.८८ टक्के)

– वरसगाव — १०.७२ (८३.६२ टक्के)

– पानशेत — ८.४० (७८.८९ टक्के)

– खडकवासला — १.१० टीएमसी (५५.५५ टक्के)

– एकूण — २२.९३ टीएमसी ( ७८.७७ टक्के)

Web Title: Pune citizens drinking water worries resolved enough water storage in khadakwasla project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • Khadakwasla Dam
  • Maharashtra Rain
  • pune news

संबंधित बातम्या

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…
1

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?
2

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही
3

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया
4

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.