
Indapur, Pune News, Agriculture News, Dattatray Bharne,
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाअभावी पाणीटंचाई तीव्र झाली आहे. नीरा नदीपात्र कोरडे पडल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. जनावरांच्या चाऱ्याची टंचाईही गंभीर बनत असल्याने पशुधन सांभाळायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
India-China Border Tension: भारतानेही करारांचा आदर करावा…; सीमावादावर चीनची पहिली प्रतिक्रीया
कळंब गावातील नागरिकांना वापराच्या पाण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नीरा नदीवरील कळंबचा बंधारा भरून मिळाल्यास परिसरातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन युवा नेते जय फडतरे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी कालवा समितीच्या बैठकीमध्ये या निवेदनाबाबत सकारात्मक विचार करून पाणी सोडण्याबाबत विचार करण्यात येईल असे कृषिमंत्री यांनी सांगितले असल्याची माहिती युवा नेते जय फडतरे यांनी सांगितले .ग्रामीण भागात सध्या दुष्काळामुळे भीषण परिस्थिती असून लवकरात लवकर निरा नदीला पाणी सोडून बंधारे भरणे आवश्यक असल्याचे मत यावेळी जय फडतरे यांनी व्यक्त केले.यावेळी चिखली, कुरवली, कळंब परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
Washim POCSO Case: धमकी देऊन तब्बल ३ वर्षे अत्याचार! किराणा विक्रेत्याने अल्पवयीन मुलीला केले गरोदर
पाणीटंचाईमुळे शेती, पशुधन आणि ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन प्रभावित होत असताना नीरा नदीत पाणी सोडण्याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कळंब येथील बंधारा भरून मिळाल्यास परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या मागणीवर संबंधित विभाग कोणती भूमिका घेतो आणि प्रत्यक्षात पाणी सोडण्याबाबत काय निर्णय होतो, याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.