भारतानेही करारांचा आदर करावा....; भारत-चीन वादावर चीनची पहिली प्रतिक्रीया
अशातच भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावावर आता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भूमिका स्पष्ट केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सोमवारी (२६ ऑक्टोबर) त्यांचे सैन्य सामान्य सीमा गस्त घालते. चीन सर्व नियमांचे पालन करतो आणि भारताकडूनही तीच अपेक्षा करतो.” अस चीनने म्हटले आहे. तसेच, “भारतासोबत राजनैतिक संवादाचा मार्ग नेहमीच खुला राहील. चीनला आशा आहे की भारत देखील परस्पर करारांचा आदर करेल आणि शांतता राखण्यासाठी ठोस पावले उचलेल. सीमावर्ती भागांमध्ये याकडे विशेष लक्ष दिले जाईल.” असंही त्यांनी नमुद केलं आहे.
या प्रकरणी, जेव्हा चिनी सैन्य “निश्चित गस्त मार्गांपासून विचलित होते, तेव्हा अशा घटना घडतात आणि त्यामुळे अशांतता निर्माण होते. चीन आणि भारत राजनैतिक आणि लष्करी मार्गांनी एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या सहमतीची अंमलबजावणी करण्यासाठी आणि सीमावर्ती भागात शांतता व स्थिरता राखण्यासाठी ठोस पावले उचलण्याकरिता भारतदेखील या दिशेने काम करेल.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “आम्ही पूर्वी कळवल्याप्रमाणे, जेव्हा चिनी सैन्य ठरलेल्या गस्तीच्या मार्गांपासून विचलित होते, तेव्हा भारत-चीन सीमावर्ती भागातील परिस्थिती वेळोवेळी बिघडते. सीमा व्यवस्थापन सुधारण्यासाठी काही विशिष्ट भागांमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत (LAC) परस्पर सामंजस्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासही दोन्ही बाजू सहमत झाल्या आहेत.
आयटीबीपीचे महासंचालक (डीजी) शत्रुजीत कपूर यांनी गुरुवारी जाहीरपणे दोन्ही देशांमधील तणावावर भाष्य केले होते. अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) विशिष्ट ठिकाणी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये अलीकडेच चकमकी झाल्या होत्या, ज्या अजूनही सुरू आहेत. असे सांगितले, तेव्हापासून हे प्रकरण समोर आले आहे
एलएसीवर तैनात असलेल्या त्यांच्या दलाच्या ‘शौर्य’ कमांडोंनी ही परिस्थिती हाताळण्यात ‘उत्कृष्ट कामगिरी’ केली आहे.भारत आपल्या ड्रोन आणि ड्रोनविरोधी क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, कारण पीपल्स लिबरेशन आर्मीचा (पीएलए) सामना करण्यासाठी ‘पारंपरिक’ लष्करी संसाधने आणि पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत असल्याचेही शत्रुजीत कपूर यांनी सांगितले होते.
पण त्याचवेळी पीएलएने आपल्या क्षमतांमध्ये लक्षणीय सुधारणा आणि आधुनिकीकरण केले आहे, ज्यामुळे चीन एक ‘अत्यंत प्रबळ प्रतिस्पर्धी’ बनला आहे. आयटीबीपीने आपल्या सर्व सीमा युनिट्समध्ये ड्रोन प्लाटूनचा समावेश केला आहे. गृह मंत्रालयाने (एमएचए) दलाच्या आधुनिकीकरणासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, ज्यापैकी ७०% रक्कम विशेषतः ड्रोन युद्ध क्षमता वाढवण्यासाठी राखून ठेवण्यात आली आहे. तसेच, हे दल पर्वतीय युद्ध, नवीन पिढीची शस्त्रे आणि निःशस्त्र लढाईचे प्रशिक्षण घेतलेल्या ‘शौर्य’ कमांडोंच्या अतिरिक्त तुकड्याही तयार करत आहे.
China has consistently and strictly abided by the relevant agreements and important understandings between the two countries, conducting routine patrols and management activities in the #border areas to safeguard territorial sovereignty and border stability, Chinese #FM spokesperson Guo Jiakun said on Monday. He made these remarks in response to reports of another standoff along the #China-#India border, where an Indian Foreign Ministry spokesperson claimed such incidents occur when Chinese troops “deviate from established patrolling patterns.” China and India remain in communication through diplomatic and military channels, Guo said. China hopes India will work in the same direction to jointly implement the understandings reached by both sides and take concrete steps to maintain peace and tranquility in the border areas, said Guo. https://t.co/V5UlKcxmls — Global Times (@globaltimesnews) October 26, 2026
Ans: ITBP चे महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी सांगितले होते की अरुणाचल प्रदेश सीमेवर गेल्या चार महिन्यांपासून भारत आणि चीनच्या सैन्यात सातत्याने तणाव व संघर्ष सुरू असून भारतीय सैन्य त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे.
Ans: चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सांगितले की त्यांचे सैन्य सामान्य गस्त घालते आणि भारताने करारांचा आदर करत सीमेवर शांतता राखण्यासाठी काम करावे.
Ans: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की चिनी सैन्य जेव्हा निश्चित केलेल्या गस्तीच्या मार्गांवरून विचलित होते, तेव्हाच सीमेवरील परिस्थिती बिघडते.






