Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Land Scam News: ताथवडे जमीन घोटाळा: ताथवडेतील सरकारी जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीचा पर्दाफाश

या घोटाळ्यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. अशा प्रकारे 'स्किप' पर्यायाचा वापर करून इतर किती जमिनींची बेकायदेशीर नोंदणी झाली आहे,

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 28, 2026 | 01:34 PM
Pune Land Scam News: Tathawade Land Scam: Illegal sale of government land in Tathawade exposed

Pune Land Scam News: Tathawade Land Scam: Illegal sale of government land in Tathawade exposed

Follow Us
Close
Follow Us:
  • वारसांची नोंद नसतानाही व्यवहार पूर्ण केला
  • ‘आयुक्त पशुसंवर्धन यांचा ताबा’ असतानाही पूर्वपरवानगीशिवाय नोंदणी
  • संगणकीय प्रणालीतील ‘स्किप’ (Skip) पर्यायाचा वापर करून नियम धाब्यावर बसवले.
Pune Land Scam News: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पुणे जिल्ह्यातील ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या शासकीय जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीचा मुद्दा गाजला. भाजप आमदार अमित गोरखे यांनी सभागृहात हा विषय अत्यंत प्रभावीपणे मांडल्यानंतर, राज्य सरकारने तातडीने दखल घेत संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणाचा आता सखोल पोलीस तपासही सुरू झाला आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

पुणे (Pune) जिल्ह्यातील ताथवडे (ता. मुळशी) येथील पशुसंवर्धन विभागाच्या मालकीच्या जमीन गट क्रमांक ३२ बाबत हा मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर ‘मा. आयुक्त पशुसंवर्धन यांचा ताबा’ आणि ‘शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय खरेदी-विक्रीस बंदी’ असा स्पष्ट उल्लेख होता. असे असतानाही नियम धाब्यावर बसवून व्यवहार करण्यात आला.

पुरंदर विमानतळासाठीच्या हालचालींना वेग; एका एकरसाठी तब्बल दोन कोटी मिळणार?

हवेली क्र. १७ उपनोंदणी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नोंदणीच्या वेळी संगणकीय प्रणालीतील ‘स्किप’ (Skip) या पर्यायाचा चुकीचा वापर केला. या तांत्रिक पळवाटेचा आधार घेऊन बेकायदेशीर खरेदीखत नोंदवण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, जमिनीचा मूळ मालक मृत असताना आणि त्यांच्या वारसांची कोणतीही नोंद नसतानाही ही विक्री प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

सरकारची कारवाई आणि तपास

प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या नोंदणी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या घोटाळ्यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. अशा प्रकारे ‘स्किप’ पर्यायाचा वापर करून इतर किती जमिनींची बेकायदेशीर नोंदणी झाली आहे, याचा शोध घेण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Pune ZP : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी हालचाली वाढल्या; 1 तारखेला राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची निर्णायक बैठक?

सभागृहात उमटले पडसाद

आमदार अमित गोरखे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे या गंभीर गैरव्यवहाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले. अशा प्रकारे तांत्रिक त्रुटींचा गैरवापर करून सरकारी जमिनी लाटण्याचे प्रकार इतर जिल्ह्यांतही सुरू आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि विकासक यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी लावून धरली.

 

दोषींवर निलंबन आणि फौजदारी कारवाई

आमदार गोरखे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री  की, या प्रकरणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रभारी दुय्यम निबंधक विद्या बडे (सांगळे) आणि वरिष्ठ लिपिक यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, पशुसंवर्धन आयुक्तांच्या तक्रारीवरून दापोडी पोलीस ठाण्यात १५ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील पोलीस चौकशी वेगाने सुरू आहे.

आमदार अमित गोरखे यांचे मत

शासकीय जमिनी हडपण्याचे आणि जनतेच्या पैशावर दरोडा टाकण्याचे प्रकार कदापि खपवून घेतले जाणार नाहीत. या प्रकरणातील मूळ सूत्रधार आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होईपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील. पारदर्शक कारभारासाठी अशा प्रवृत्तींना आळा घालणे आवश्यक आहे.

 

 

 

Web Title: Pune land scam news tathawade land scam illegal sale of government land in tathawade exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

Loni-Kalbhor News: मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग, काय आहेत दुष्परिणाम?
1

Loni-Kalbhor News: मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग, काय आहेत दुष्परिणाम?

पुरंदर विमानतळासाठीच्या हालचालींना वेग; एका एकरसाठी तब्बल दोन कोटी मिळणार?
2

पुरंदर विमानतळासाठीच्या हालचालींना वेग; एका एकरसाठी तब्बल दोन कोटी मिळणार?

Pune ZP : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी हालचाली वाढल्या; 1 तारखेला राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची निर्णायक बैठक?
3

Pune ZP : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी हालचाली वाढल्या; 1 तारखेला राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची निर्णायक बैठक?

‘देशभरात असेल पाऊस पण पुण्यात फक्त…’; तापमानाची स्थिती काय? पुढील दोन दिवस…
4

‘देशभरात असेल पाऊस पण पुण्यात फक्त…’; तापमानाची स्थिती काय? पुढील दोन दिवस…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.