Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरंदर विमानतळासाठीच्या हालचालींना वेग; एका एकरसाठी तब्बल दोन कोटी मिळणार?

भूसंपादनासाठी आवश्यक निधी उभारण्यासाठी विशेष हेतू प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून, त्यात एमआयडीसी, एमएडीसी आणि सिडको यांचा समावेश आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 28, 2026 | 12:17 PM
पुरंदर विमानतळासाठीच्या हालचालींना वेग; एका एकरसाठी तब्बल दोन कोटी मिळणार?

पुरंदर विमानतळासाठीच्या हालचालींना वेग; एका एकरसाठी तब्बल दोन कोटी मिळणार?

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सुमारे 3 हजार एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार असून, त्यासाठी 6 हजार कोटी रुपयांची कर्जउभारणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाने 10 फेब्रुवारी रोजी मान्यता दिली आहे. या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना प्रतिएकरी सुमारे दोन कोटी रुपये मोबदला देण्यात येणार का, याबाबत परिसरात चर्चा रंगली आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूसंपादनासाठी आवश्यक निधी उभारण्यासाठी विशेष हेतू प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून, त्यात एमआयडीसी, एमएडीसी आणि सिडको यांचा समावेश आहे. मंजूर कर्जातून लवकरच शेतकऱ्यांना मोबदला अदा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, जाहीर केलेल्या कालावधीनंतरही प्रत्यक्ष मोबदला वितरण सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

दरम्यान, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा सुरुवातीपासूनच विरोध राहिला आहे. जमिनींचे सर्वेक्षण, मोजणी प्रक्रिया आणि निर्णय प्रक्रियेत शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप वारंवार करण्यात येत आहे. अंतिम बाजारभाव किती ठरवण्यात आला आहे, तो कोणत्या निकषांवर निश्चित झाला आणि संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

तीन हजार एकरांसाठी सहा हजार कोटींची तरतूद लक्षात घेतल्यास प्रतिएकरी दोन कोटींचा दर अपेक्षित आहे का, याबाबत शासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण येण्याची प्रकल्पबाधितांची मागणी आहे.

परस्पर ड्रोनच्या माध्यमातून मोजणी करण्याचा प्रयत्न

दुसरीकडे, पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्प बाधित गावात भूमी अभीलेख आणि महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या परस्पर ड्रोनच्या माध्यमातून मोजणी करण्याचा प्रयत्न केला होता. याची माहिती शेतकऱ्यांना मिळताच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने जमून अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केल्याने मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अक्षरशः पळ काढावा लागला आहे.

पुरंदरमधील शेतकरी आक्रमक

काही दिवसांपूर्वीच, शेतकऱ्यांनी जमून अधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला. त्यामुळे त्यांना कामच करता येईना. त्यानंतर काही वेळाने पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत स्वतः त्या ठिकाणी जाऊन शासकीय जमिनीची मोजणी सुरु असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर शेतकऱ्यांनी जर शासकीय जमिनीची मोजणी केली असेल तर तशी कागदपत्रे दाखवा, अशी मागणी केली. आम्हाला विमानतळाची आवश्यकता नाही. आमचा या विमानतळाला विरोध आहे. आमची सुजलाम सुफलाम जमीन तुम्ही भुरळ पाडून घेत आहात, असा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा : मोठी बातमी! Purandar Airport ला राज्य शासनाची मान्यता; 1 जून 2026 पर्यंत…, काय आहेत निर्देश?

Web Title: Movement for purandar airport accelerates will you get as much as two crores for one acre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • pune news
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

Navarashtra Special: मुंग्यांच्या वारुळांचे अदृश्य होत चाललेले जग; पर्यावरणातील असमतोलाचा गंभीर इशारा
1

Navarashtra Special: मुंग्यांच्या वारुळांचे अदृश्य होत चाललेले जग; पर्यावरणातील असमतोलाचा गंभीर इशारा

येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्…
2

येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्…

Pune Water Supply: शहरी विकास निधीतून पुण्याला 1,290 कोटींची मंजुरी
3

Pune Water Supply: शहरी विकास निधीतून पुण्याला 1,290 कोटींची मंजुरी

पुण्यात खळबळ ! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह; चिठ्ठीही सापडली
4

पुण्यात खळबळ ! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह; चिठ्ठीही सापडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.