Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Loni-Kalbhor News: मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग, काय आहेत दुष्परिणाम?

आगीमुळे पाण्याचे तापमान प्रचंड वाढते आणि पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. यामुळे मासे, कासव आणि इतर जलचर प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होतो.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 28, 2026 | 02:50 PM
Loni-Kalbhor News: मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग, काय आहेत दुष्परिणाम?
Follow Us
Close
Follow Us:
  • दररोज ३०-३५ ट्रॉली कचरा प्रक्रियाविना राहिल्यामुळे काळा धूर, श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ
  • कचरा जाळणाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत
  • केवळ कागदावरच्या स्वच्छतेच्या घोषणा थांबवून प्रत्यक्ष कृती करावी
 

Loni-Kalbhor News: लोणी काळभोर–कदमवाकवस्ती परिसरातील मुळा–मुठा नदी पात्रात साचलेल्या प्रचंड कचऱ्याला शुक्रवारी भीषण आग लागून संपूर्ण परिसर धुराच्या विळख्यात सापडला. काळ्या धुराचे लोट आकाशात झेपावले; नागरिकांना श्वास घेणे कठीण झाले, डोळ्यांची जळजळ व घसा खवखवण्याच्या तक्रारी वाढल्या. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली; मात्र मूळ प्रश्न कायम आहे.

लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती या वेगाने वाढणाऱ्या ग्रामपंचायती ,पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग लगत असल्याने येथे हॉटेल्स, मंगल कार्यालये व विविध व्यावसायिक आस्थापनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दररोज तब्बल ३० ते ३५ ट्रॉलींहून अधिक कचरा निर्माण होत असल्याचा अंदाज आहे; मात्र त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ना पुरेशी जागा, ना स्वतंत्र प्रकल्प. परिणामी हा सर्व कचरा थेट नदीपात्रात ढकलला जातो आणि नंतर त्यालाच आग लावली जाते, अशी गंभीर बाब समोर आली आहे. (Pollution )

Pune Land Scam News: ताथवडे जमीन घोटाळा: ताथवडेतील सरकारी जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीचा पर्दाफाश

हा प्रकार नवीन नसून यापूर्वीही अशाच घटना घडल्या आहेत. तरीही प्रशासनाकडून ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना दिसत नाहीत. ‘स्वच्छते’च्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

या आगीमुळे वायुप्रदूषणासोबतच जलप्रदूषणाचाही धोका वाढला आहे. नदीचे पाणी दूषित होत असून जलचरांच्या अस्तित्वावर गदा येत आहे. परिसरात शाळा व महाविद्यालये असल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीपात्रात अवैधरित्या कचरा टाकणे व तो जाळणे हा सरळ पर्यावरणीय गुन्हा असल्याची टीका स्थानिकांकडून होत आहे. संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र व आधुनिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

१. नदीला आग लागण्याची मुख्य कारणे

नदीच्या संथ पाण्यात जेव्हा विशिष्ट घटक मिसळतात, तेव्हा आगीचा धोका निर्माण होतो:ज्वलनशील रासायनिक सांडपाणी: औद्योगिक क्षेत्रातून शुद्धीकरण न करता सोडलेले रसायने, तेल (Oil) आणि ग्रीस थेट नदीत मिसळतात. हे घटक पाण्यावर तवंग तयार करतात, जे अत्यंत ज्वलनशील असतात.

मिथेन वायूची निर्मिती: नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कचरा (मलनिस्सारण आणि सांडपाणी) सडल्यामुळे मिथेन ($CH_4$) सारखे ज्वलनशील वायू तयार होतात. पाण्याखाली साचलेले हे वायू बुडबुड्यांच्या स्वरूपात बाहेर पडतात आणि एखाद्या ठिणगीमुळे पेट घेऊ शकतात.

जलपर्णी आणि कचरा: नदीत साचलेली वाळलेली जलपर्णी आणि प्लास्टिकचा कचरा उन्हाळ्यात उष्णतेमुळे किंवा मानवी चुकीमुळे (उदा. बिडी/सिगारेट टाकणे) पेट घेतो. हा कचरा रासायनिक तवंगासोबत मिसळल्यास आग अधिक वेगाने पसरते.

कॅनॉल किंवा पाईपलाईन गळती: नदीपात्राच्या जवळून किंवा खालून जाणाऱ्या इंधन वाहक पाईपलाईनमधून गळती झाल्यास तेल पाण्यात पसरून आगीचा भडका उडू शकतो.  (Pune) 

Pune Politics: पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय रचनेवरून राजकारण; राष्ट्रवादीचा प्रशासनावर ‘राजकीय’ हेतूचा आरोप

२. आगीचे गंभीर दुष्परिणाम

 

जलचर सृष्टीचा नाश: आगीमुळे पाण्याचे तापमान प्रचंड वाढते आणि पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. यामुळे मासे, कासव आणि इतर जलचर प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होतो.

जैवविविधतेची हानी: नदीकाठची झाडे, पक्ष्यांची घरटी आणि सूक्ष्मजीव आगीत जळून खाक होतात, ज्यामुळे नैसर्गिक अन्नसाखळी विस्कळीत होते.

वायू प्रदूषण: रसायने आणि प्लास्टिक जळल्यामुळे वातावरणात विषारी धूर (उदा. कार्बन मोनोऑक्साइड, डायॉक्सिन) पसरतो, ज्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना श्वसनाचे त्रास होऊ शकतात.

पाण्याच्या गुणवत्तेत घट: जळालेली राख आणि अर्धवट जळलेली रसायने पाण्यात विरघळल्यामुळे पाणी पिण्यायोग्य किंवा शेतीसाठी वापरण्यायोग्य राहत नाही.

३. प्रतिबंधात्मक उपाय

अशा घटना रोखण्यासाठी खालील पावले उचलणे गरजेचे आहे:
१. उद्योगांनी रासायनिक पाणी ‘ईटीपी’ (ETP) प्लँटमध्ये शुद्ध करूनच सोडावे.
२. नदीपात्रातील जलपर्णी आणि कचऱ्याची नियमित स्वच्छता करणे.
३. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) अधिक सक्षम करणे.

 

 

Web Title: Loni kalbhor news massive fire breaks out in mula mutha riverbed in loni kalbhor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

Transporters Strike 2026: राज्यात ५ मार्चपासून ट्रान्सपोर्टरचा चक्का जाम! टोल आणि ई-चलन नियमांविरोधात बेमुदत आंदोलनाचे हत्यार
1

Transporters Strike 2026: राज्यात ५ मार्चपासून ट्रान्सपोर्टरचा चक्का जाम! टोल आणि ई-चलन नियमांविरोधात बेमुदत आंदोलनाचे हत्यार

Pune Land Scam News: ताथवडे जमीन घोटाळा: ताथवडेतील सरकारी जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीचा पर्दाफाश
2

Pune Land Scam News: ताथवडे जमीन घोटाळा: ताथवडेतील सरकारी जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीचा पर्दाफाश

पुरंदर विमानतळासाठीच्या हालचालींना वेग; एका एकरसाठी तब्बल दोन कोटी मिळणार?
3

पुरंदर विमानतळासाठीच्या हालचालींना वेग; एका एकरसाठी तब्बल दोन कोटी मिळणार?

Pune ZP : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी हालचाली वाढल्या; 1 तारखेला राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची निर्णायक बैठक?
4

Pune ZP : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी हालचाली वाढल्या; 1 तारखेला राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची निर्णायक बैठक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.