Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी हालचाली वाढल्या; 1 तारखेला राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची निर्णायक बैठक?

सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक १ तारखेला पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 28, 2026 | 01:20 PM
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत रस्सीखेच; तरुण की अनुभवी, कोणाला मिळणार संधी?

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत रस्सीखेच; तरुण की अनुभवी, कोणाला मिळणार संधी?

Follow Us
Close
Follow Us:
  • पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी हालचाली वाढल्या
  • उद्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक
  • बैठक निर्णायक ठरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर पुणे जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक १ तारखेला पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदांच्या निवडीच्या अनुषंगाने ही बैठक निर्णायक ठरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

 

या बैठकीस आमदार, माजी आमदार, जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून, जिल्ह्यातील सत्तासमीकरणाचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. कोणत्या तालुक्यात पक्षाचे संख्याबळ किती आहे, कुठे स्पष्ट बहुमत आहे आणि कुठे आघाडीची आवश्यकता आहे, या तपशीलवार चर्चा होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या संभाव्य दावेदारांची नावेही या बैठकीत समोर येण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, पंचायत समिती स्तरावर काही ठिकाणी निर्माण झालेल्या पेचप्रसंगांवर तोडगा काढण्यासाठी आघाडी किंवा युतीबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. कोणत्या पक्षासोबत हातमिळवणी करायची, कुठे स्वतंत्र सत्ता स्थापन करायची आणि कुठे तडजोडीचा मार्ग स्वीकारायचा, यावर नेतृत्व अंतिम भूमिका मांडणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदे ही केवळ औपचारिक पदे नसून विकास निधी, धोरणात्मक निर्णय आणि प्रशासकीय नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे या पदांसाठी पक्षांतर्गत चुरस वाढली असून, इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे आपापल्या ताकदीचे गणित मांडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पक्षातील गटबाजी टाळून सर्वानुमते निर्णय घेण्यावर भर दिला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा : काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय, 2029 साली देशात काँग्रेसची सत्ता येणार; हर्षवर्धन सपकाळांचा विश्वास

राष्ट्रवादीमध्ये ‘सव्वा-सव्वा वर्षांचा’ फॉर्म्युला?

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात हालचालींना वेग आला आहे. अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. पुणे जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असला तरी नियमानुसार त्यातील पहिली अडीच वर्षे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठरली आहेत. या पार्श्वभूमीवर पहिल्या अडीच वर्षांत ‘सव्वा-सव्वा वर्षांचा’ फॉर्म्युला राबविण्याबाबत अंतर्गत स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ग्रामविकास विभागाने काढलेल्या आदेशानुसार २० मार्च २०२६ पूर्वी जिल्हा परिषद आणि संबंधित पंचायत समित्यांची पहिली बैठक आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title: Ncp meeting to be held to decide on pune zilla parishad president post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • pune news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

पुणे जिल्हा परिषदेत विषय समित्यांचे वाटप; हुलावळे अन् नलावडे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी
1

पुणे जिल्हा परिषदेत विषय समित्यांचे वाटप; हुलावळे अन् नलावडे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी

Khanwadi School Case: चुकीची माहिती पसरवणे पडले महागात; शिक्षण विस्तार अधिकारी निलंबित
2

Khanwadi School Case: चुकीची माहिती पसरवणे पडले महागात; शिक्षण विस्तार अधिकारी निलंबित

निकोप स्पर्धेमुळेच पुणे परिमंडलाची कामगिरी झळकली; डॉ. भूजंग खंदारे यांच्याकडून कौतुक
3

निकोप स्पर्धेमुळेच पुणे परिमंडलाची कामगिरी झळकली; डॉ. भूजंग खंदारे यांच्याकडून कौतुक

Maharashtra Politics : प्रचार सुनेत्रा काकींचा महायुतीचा नाही…; रोहित पवारांनी साधला भाजपवर निशाणा
4

Maharashtra Politics : प्रचार सुनेत्रा काकींचा महायुतीचा नाही…; रोहित पवारांनी साधला भाजपवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.